CoronaVirus News : कडक सॅल्यूट! कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमावला; 15 लाखांची FD मोडून दाम्पत्य करतंय रुग्णांची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 02:04 PM2021-04-26T14:04:11+5:302021-04-26T14:08:06+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : मुलाच्या मृत्यूनंतर खचून न जाता त्यांनी कोरोनाच्या या महाभयंकर संकटात इतरांचा जीव वाचवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसतं-खेळतं घर कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. मात्र कोरोनाच्या कठीण काळातही अनेकांनी आपलं दु:ख बाजुला सारून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशीच एक घटना अहमदाबादमध्ये देखील घडली आहे.
कोरोनामुळे एका दाम्पत्याने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. मात्र मुलाच्या मृत्यूनंतर खचून न जाता त्यांनी कोरोनाच्या या महाभयंकर संकटात इतरांचा जीव वाचवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. दाम्पत्याने 15 लाखांची एफडी मोडून तो पैसा गरजुंच्या उपचारासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. रसिक मेहता आणि कल्पना मेहता असं या गुजरातच्याअहमदाबादमधील दाम्पत्याचं नाव आहे. रसिक आणि कल्पना या सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात गरजुंना आवश्यकत ती सर्व मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
CoronaVirus News : जिंकलंस मित्रा! कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडर पोहचवण्यासाठी करतोय धडपडhttps://t.co/OyNTIRJNSJ#CoronavirusIndia#coronavirus#coronainmaharashtra#MaharashtraFightsCorona#OxygenMan#ShahnawazShaikh
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2021
मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मेहता दामप्त्याने 15 लाख रुपयांची केली होती एफडी
गेल्या वर्षी मेहता दाम्पत्याच्या एकुलत्या एका मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ज्या मुलासाठी त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली तोच मुलगा कोरोनानं त्यांच्यापासून हिरावून नेला. या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मेहता दामप्त्याने 15 लाख रुपयांची एफडी केली होती. पण मुलाचाच मृत्यू झाला. मग पैशाचं काय करणार. त्यामुळे त्यांनी इतर कुटुंबावर ही वेळ येऊ नये म्हणून हे 15 लाख रुपये कोरोनाच्या रुग्णांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला. रसिक मेहता आणि त्यांच्या पत्नी कल्पना यांनी कोरोना रुग्णांवर वेळेत आणि चांगले उपचार व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले.
CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच होतेय लागण; परिस्थिती गंभीरhttps://t.co/lciq4X2rGo#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#AIIMS#Doctors
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2021
मेहता दाम्पत्याने 200 पेक्षा अधिक रुग्णांना आयसोलेशनमध्ये किट आणि इतर साहित्य केलं वाटप
मेहता दाम्पत्याने 200 पेक्षा अधिक रुग्णांना आयसोलेशनमध्ये किट आणि इतर साहित्य वाटप केलं आहे. कोरोनापासून प्रतिबंध व्हावा म्हणून त्यांनी 350 पेक्षा अधिक लोकांना त्यांच्या खर्चानं लसीकरणही केलं आहे. मेहता दाम्पत्य रोज सकाळी अशा लोकांचा शोध घेतात ज्यांना खरंच कोरोना काळात उपचारांसाठी मदतीची गरज आहे. ज्यांनी अद्याप लसीकरण केलं नसेल त्यांना ते स्वतःच्या कारमध्येच लसीकरणासाठी घेऊन जातात. आतापर्यंत त्यांनी अनेकांना मदत केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं कुटुंब आठवड्याभरात कोरोनामुळे उद्ध्वस्त झालंhttps://t.co/huFlh1p5NS#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2021