CoronaVirus News : "पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचे सुपर स्प्रेडर"; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचं जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:34 PM2021-04-28T12:34:32+5:302021-04-28T12:51:12+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

CoronaVirus Live Updates covid 19 ima vice president pm modi calls corona super spreader | CoronaVirus News : "पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचे सुपर स्प्रेडर"; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचं जोरदार टीकास्त्र

CoronaVirus News : "पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचे सुपर स्प्रेडर"; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचं जोरदार टीकास्त्र

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या 1,79,97,267 वर पोहोचली आहे. तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच रुग्णांची संख्या ही अत्यंत वेगाने वाढत आहे. लसीकरणाची मोहीम देखील वेगाने सुरू आहे. याच दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "नरेंद्र मोदी कोरोनाचे सुपर स्प्रेडर आहेत" असं म्हणत दहिया यांनी हल्लाबोल केला आहे. 

देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना राजकीय सभा घेणे तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहमती दर्शवल्याने कोरोनाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाला आहे. म्हणून त्यांनी मोदींना कोरोना व्हायरसचे सुपर स्प्रेडर म्हटलं आहे. द ट्रेब्युने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाचे नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही असं डॉ. नवज्योत यांनी म्हटलं आहे. 

"देशातील आरोग्य सेवा डळमळत असल्याचं चित्र दिसत आहे"

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दहिया यांनी देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी 2020 मध्ये आढळून आला. त्यावेळीही मोदींनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही असं म्हटलं आहे. तसेच " कोरोना रुग्ण आढळल्यानंतर नरेंद्र मोदींनी यासंदर्भातील उपाययोजना करुन प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करून लाखो लोकांना एकत्र करुन सभा घेतली. आता कोरोनाच्या दुसरी लाट अद्याप सर्वोच्च स्तरावर (पीकवर) पोहचलेली नसतानाही देशातील आरोग्य सेवा डळमळत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र पंतप्रधानांनी मागील वर्षभरामध्ये आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात काही निर्णय घेतल्याचं दिसून आलं नाही" असं देखील म्हटलं आहे. 

"शेतकरी आंदोलनासंदर्भातही पंतप्रधान मोदींनी योग्य ते निर्णय घेतले नाहीत"

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही कोरोना परिस्थितीवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी रुग्ण दगावत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासंदर्भातील होकार केंद्राने न दिल्याने प्रकल्प रडखले आहेत. मोदी सरकारने या गोष्टींना फार महत्व दिलं नाही असा हल्लाबोल नवज्योत यांनी केला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मशानभूमींबाहेर अंत्यविधीसाठी लागलेल्या रांगा या कोरोना परिस्थितीची दाहकता दर्शवणाऱ्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भातही पंतप्रधान मोदींनी योग्य ते निर्णय घेतले नाहीत. मोठ्या प्रमाणात आंदोलक शेतकऱ्यांना एकत्र येऊ दिलं. प्रश्न सोडवण्यापेक्षा आंदोलन होऊ दिलं आणि त्या माध्यमातून कोरोनाचा धोका वाढला असं देखील डॉ. नवज्योत दहिया यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates covid 19 ima vice president pm modi calls corona super spreader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.