CoronaVirus Live Updates : गुजरातमध्ये गोशाळेत उभारलं कोविड सेंटर; गोमूत्र व दूधाच्या मदतीने रुग्णावर उपचार केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:47 PM2021-05-10T13:47:35+5:302021-05-10T13:51:10+5:30

Covid Care Centre In Gaushala : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात गोशाळेचं रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आलं आहे.

CoronaVirus Live Updates covid care centre in gaushala in gujarat treatment with cow milk and urine | CoronaVirus Live Updates : गुजरातमध्ये गोशाळेत उभारलं कोविड सेंटर; गोमूत्र व दूधाच्या मदतीने रुग्णावर उपचार केल्याचा दावा

CoronaVirus Live Updates : गुजरातमध्ये गोशाळेत उभारलं कोविड सेंटर; गोमूत्र व दूधाच्या मदतीने रुग्णावर उपचार केल्याचा दावा

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 2,26,62,575 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,66,161 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,754 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,46,116 लोकांना जीव गमवावा लागला आहे. गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत अनेक दावे केले जात आहेत. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात गोशाळेचं रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. येथील रुग्णांवर गाईचं दूध आणि गोमूत्रापासून तयार करण्यात आलेल्या औषधांच्या मदतीने उपचार केले जात आहेत.

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील गावात सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरचं नाव ‘वेदालक्षण पंचगव्य आयुर्वेद कोविड आयसोलेशन सेंटर’ असं आहे. 5 मे रोजी हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलं. येथे सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. हे कोविड सेंटर चालवणारे मोहन जाधव यांनी इंडियन एक्स्प्रेसला याबाबत माहिती दिली आहे. कोविड सेंटरमध्ये सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णाला आठ प्रकारच्या औषधी दिल्या जातात. 

गाईचं दूध, तूप आणि गोमूत्रापासून औषधं तयार करण्यात आली आहेत. पंचगव्य आयुर्वदिक पद्धतीने करोना रुग्णांवर उपचार केले जातात. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना गो तीर्थ दिलं जातं. जे गोमूत्र आणि इतर वनस्पतींपासून बनवलेलं आहे. त्याचबरोबर रुग्णांना प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही औषधी दिली जाते, जी गायीच्या दूधापासून तयार केलेली आहेत अशी माहिती जाधव यांनी दिली आहे. तसेच गोशाळा कोविड सेंटरमध्ये दोन आयुर्वेदिक डॉक्टरांनाही नियुक्त करण्यात आलेलं आहे. हे डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करतात. रुग्णांना गरज भासल्यास अॅलोपॅथिक औषधीही दिल्या जातात. त्यासाठीही दोन एमबीबीएसपर्यंत शिक्षण झालेले डॉक्टर नियुक्त करण्यात आलेले आहेत असंही जाधव यांनी म्हटलं आहे. 

गोशाळेमध्ये सुरू असलेल्या या कोविड सेंटरविषयी बोलताना बनासकांठाचे जिल्हाधिकारी आनंद पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. गोशाळेत सुरू असलेल्या कोविड सेंटरबद्दल माहिती देण्यात आली होती आणि त्याला परवानगीही देण्यात आलेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने सात कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला

ऑक्सिजन मिळण्यास उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील सात रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला. रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळेच यासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टँकर रस्ता चुकला आणि ऑक्सिजन अभावी सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates covid care centre in gaushala in gujarat treatment with cow milk and urine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.