CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रुग्णसेवेसाठी कोरोना वॉरिअर्सचा जीव मुठीत घेऊन प्रवास; जेसीबीतून पार केली नदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:16 PM2021-06-09T16:16:48+5:302021-06-09T16:31:29+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात आपल्या घरापासून दूर राहून डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत आहेत. असीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

CoronaVirus Live Updates covid19 warriors crossing ladakh river in see viral photo | CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रुग्णसेवेसाठी कोरोना वॉरिअर्सचा जीव मुठीत घेऊन प्रवास; जेसीबीतून पार केली नदी

CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रुग्णसेवेसाठी कोरोना वॉरिअर्सचा जीव मुठीत घेऊन प्रवास; जेसीबीतून पार केली नदी

Next

नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,90,89,069 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 92,596 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2219 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,53,528 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. आपल्या घरापासून दूर राहून डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत आहेत. असीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

रुग्णांची सेवा करता यावी, त्यांच्यावर वेळेत उपचार करता यावेत यासाठी कोरोना वॉरिअर्सनी चक्क जेसीबीतून नदी पार केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर कोरोना वॉरिअर्सचा हा फोटो तुफान व्हायरल झाला असून त्यांचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. लडाखमधील हा फोटो असल्याचं म्हटलं जात आहे. काही वैद्यकीय कर्मचारी दुर्गम भागात आपली वैद्यकीय सेवा बजावण्याठी जात आहेत. यावेळी त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रुग्णांची सेवा करण्यासाठी जात असताना त्यांना जेसीबीच्या सहाय्याने नदी पार करावी लागत आहे. 

नदी पार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना जेसीबीची मदत घ्यावी लागली आहे. लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे. "आपल्या कोरोना योद्ध्यांना सलाम, ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी कोरोना योद्ध्यांची टीम नदी पार करत आहे. घरीच सुरक्षित राहा आणि कोरोना योद्ध्यांना सहकार्य करा" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. सर्वांनीच कोरोना वॉरिअर्सच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरण

कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर येत आहे. देशात एक असं गाव आहे जिथे 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या  (Jammu Kashmir) बांदीपोरा जिल्ह्यातील वेयान हॅमलेट हे गाव देशातलं पहिलं असं गाव ठरलं आहे, जिथे 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात एकूण 362 वयस्कर लोक आहेत आणि त्या सर्वांनी लस घेतलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि जिद्दीमुळे हे शक्य झालं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेयान हे गाव बांदीपोरा जिल्हा मुख्यालयापासून केवळ 28 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र तिथे जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना जवळपास 18 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागतं असं म्हटलं आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates covid19 warriors crossing ladakh river in see viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.