CoronaVirus Live Updates : कोरोनाचं भीषण वास्तव! स्मशानभूमीत जागाच मिळेना; पार्किंगमध्ये 15 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 12:53 PM2021-04-18T12:53:44+5:302021-04-18T13:09:15+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates :
नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे. याच दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीत हे धक्कादायक चित्र पाहायला मिळालं आहे. पार्किंगमध्येच आतापर्यंत पंधरा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत मृतदेह जळत असल्यानं स्मशानभूमीमधील फरशी आणि प्लेटदेखील खराब झाल्या आहेत.
नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,77,150 लोकांना गमवावा लागला जीवhttps://t.co/d0mF2tbrVl#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2021
पूर्व दिल्लीतील पाच स्मशानभूमीपैकी सीमापुरी स्मशानात परिस्थिती सर्वात वाईट आहे. कोविडसाठीचे 12 प्लॅटफॉर्मही कमी पडत असल्याचं चित्र आहे. याच कारणामुळे स्मशानभूमीजवळ असणाऱ्या दिल्ली महानगरपालिकेच्या पार्किंगच्या जागेवर लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ज्योत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या आधी याठिकाणी लहान मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र पाच वर्षांपूर्वी येथे मुलांवर अंत्यसंस्कार करणं बंद करण्यात आलं होता.
CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटातील धक्कादायक वास्तव; रुग्णालयात बेड मिळत नाहीत तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडतेय https://t.co/GhjCaXhSNk#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 17, 2021
सतत जळताहेत मृतदेह...; कोरोनामुळे परिस्थिती गंभीर
जागेवर महामंडळचं पार्किंग करायचं होतं, मात्र परिस्थिती लक्षात घेता याजागी आता पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शनिवारी येथे एकूण 43 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, जीटीबी हॉस्पिटलचे 36 मृतदेह, मोहन नगर येथील नरेंद्र मोहन रुग्णालयातील एक, गुप्ता नर्सिंग होममधील एक, लोणी रोड येथील एका मृतदेहाचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळत नाही आहेत. तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी घटना समोर आली आहे.
CoronaVirus Live Updates : शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात अचानक लागली आग, जवळपास 50 रुग्ण घेत होते उपचार https://t.co/Ujm6n1mO3N#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#fire#Hospital
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2021
भयावह! स्मशानभूमीत कमी पडतेय जागा; रहिवाशी कॉलनीत मृतदेहावर अंत्यसंस्कार; घटनेने खळबळ
रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाची राख आसपास असलेल्या घरांजवळ पसरली. याप्रकारानंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. लोकांनी मृत्यू झालेला व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कोणतेही नियम पाळण्यात आलेले नसल्याचं देखील सांगितलं आहे. ती व्यक्ती खरंच पॉझिटिव्ह होती का याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला https://t.co/d0rK3yu0oX#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiapic.twitter.com/CUDgWayujA
— Lokmat (@MiLOKMAT) April 17, 2021