CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 2 मुलं झाली अनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 05:22 PM2021-06-21T17:22:43+5:302021-06-21T17:24:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत.

CoronaVirus Live Updates family first father and mother died son and daughter became orphans | CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 2 मुलं झाली अनाथ

CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 2 मुलं झाली अनाथ

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांचा आकडा 2,99,35,221 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53,256 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1422 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,88,135 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. 

कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने दोन मुलं अनाथ झाली आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्या मंडळींचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आधी बाबांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आईला देखील जीव गमवावा लागल्याचं मुलांनी म्हटलं आहे. अवघ्या काही महिन्यांत दोघांचाही मृत्यू झाल्याने दोन मुलं आता पोरकी झाली आहेत. मुकेश जोशी असं या मुलांच्या वडिलांचं नाव आहे. ते फार्मासिस्ट म्हणून नोकरी करत होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आणि 13 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. 

पतीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पत्नी देखील कोरोना संक्रमित झाली. गेले कित्येक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 20 जून रोजी त्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने दोन्ही मुलं आता पोरकी झाली आहेत. या मुलांकडे लक्ष देण्यात यावं तसेच त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी विनंती गावकऱ्यांनी पंजाब सरकारकडे केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. योग्य ती खबरदारी वेळोवेळी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाखांवर; 166 दिवसांत 20 लाख मृत्यू

कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 166 दिवसांत तब्बल 20 लाख मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्याचं भीषण चित्र आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील मृतांचा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला आहे. 166 दिवसांत तब्बल 20 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि मेक्सिकोचा समावेश आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी 50 टक्के मृत्यू याच देशांमध्ये झाले आहेत. लोकसंख्येनुसार मृत्यू दर पाहिल्यास यामध्ये पेरू, हंगेरी, बोस्निया सारख्या देशांची नावे आघाडीवर आहेत. जून महिन्यात सर्वाधिक बाधित असलेल्या 10 देशांपैकी 9 देश दक्षिण अमेरिकेतील आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title: CoronaVirus Live Updates family first father and mother died son and daughter became orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.