बापरे! वडिलांच्या उपचारासाठी मुलाने घेतलं 35 लाखांचं लोन पण कोरोनाने घेतला जीव; आता EMI मध्येच जातो पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 04:40 PM2021-06-06T16:40:11+5:302021-06-06T16:56:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. 

CoronaVirus Live Updates gujarat covid positive patient son take loan for covid medical bill | बापरे! वडिलांच्या उपचारासाठी मुलाने घेतलं 35 लाखांचं लोन पण कोरोनाने घेतला जीव; आता EMI मध्येच जातो पगार

बापरे! वडिलांच्या उपचारासाठी मुलाने घेतलं 35 लाखांचं लोन पण कोरोनाने घेतला जीव; आता EMI मध्येच जातो पगार

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,88,09,339 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,14,460 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2677 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,46,759 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. 

एका मुलाने आपल्या वडिलांच्या उपचारासाठी तब्बल 35 लाखांचं लोन घेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता संपूर्ण पगार हा EMI मध्येच जात आहे. गुजरातच्या गांधी नगरमध्ये राहणाऱ्या राजन भलाणी यांनी आपल्या वडिलांवर चांगले उपचार करता यावेत यासाठी 35 लाखांचं लोन घेतलं. राजन यांचे वडील जयेश भलाणी यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 40 दिवस गांधीनगरमधील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र याच दरम्यान त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. 

https://bit.ly/2RpCMIl

वडिलांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून राजन यांना मोठा धक्काच बसला. त्यांचे वडील जवळपास 10 दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे रुग्णालयाने व्हेंटिलेटरसाठी दररोज 50 हजार रुपये चार्ज लावला आहे. औषधं आणि इंजेक्शनच्या नावाने दररोज 75 हजार वसूल करण्यात आले. रुग्णालयाचं एकूण बिल हे 18 लाख झालं आणि इंजेक्शन आणि औषध यासारख्या बाहेरून ज्या गोष्टी आणल्या गेल्या त्यासाठी 15 लाख रुपये खर्च आला आहे. त्यामुळेच राजन यांनी बँकेकडून 35 लाखांचं लोन काढलं आहे. पगार येतो तो सर्व ईएमआयमध्ये जातो असं राजन यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! कोरोना निगेटिव्ह रुग्णाला सांगितलं पॉझिटिव्ह; मृत्यूनंतर 4 दिवसांचं दिलं 2 लाख बिल

एका रुग्णाला तो निगेटिव्ह असताना देखील कोरोना पॉझिटिव्ह सांगून त्याच्यावर उपचार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चार दिवसांचं तब्बल दोन लाख रुपये बिल दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणाच्या सुपौल जिल्ह्यातील छतरपूर येथील 55 वर्षीय मदन साह यांना पूर्णिया जिल्ह्यातील अल्पना न्यूरो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. मदन यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन यांची आधी कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आली होती. 

न्यूरो रुग्णालयाने त्यानंतर आपल्या लॅबमध्ये त्यांची पुन्हा एकदा चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचं सांगून त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतलं. चार दिवसांनी मदन यांचा मृत्यू झाल्यावर रुग्णालयाने त्यांना तब्बल दोन लाखांचं बिल दिलं. तसेच 15 हजारांची चार रेमडेसिवीर इंजेक्शन ही रुग्णाला देण्यात आली होती. नातेवाईकांनी 1.60 लाखांचं बिल भरलं. मात्र 40 हजार आणखी दिले जात नाहीत तोपर्यंत डेथ सर्टिफिकेट देणार नसल्याचं रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates gujarat covid positive patient son take loan for covid medical bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.