CoronaVirus Live Updates : भयंकर! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोना, 32 वेळा Mutation; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 10:01 AM2021-06-05T10:01:33+5:302021-06-05T10:14:55+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : HIV पॉझिटिव्ह महिलेमध्ये तब्बल 216 दिवसांपर्यंत कोरोना इन्फेक्शन राहिल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे याच दरम्यान व्हायरसमध्ये 32 वेळा म्यूटेशन (Mutations) झालं.

CoronaVirus Live Updates hiv positive woman hosted coronavirus for 216 days during this period virus mutated 32 times | CoronaVirus Live Updates : भयंकर! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोना, 32 वेळा Mutation; रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Live Updates : भयंकर! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोना, 32 वेळा Mutation; रिसर्चमधून मोठा खुलासा

googlenewsNext

वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील सर्वच देश हे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान कोरोनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये हैराण करणारी घटना घडली आहे. एका 36 वर्षीय HIV पॉझिटिव्ह महिलेमध्ये तब्बल 216 दिवसांपर्यंत कोरोना इन्फेक्शन राहिल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे याच दरम्यान व्हायरसमध्ये 32 वेळा म्यूटेशन (Mutations) झालं. एका नव्या रिसर्चमध्ये हा मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, व्हायरसच्या (Virus) स्पाइक प्रोटीनमध्येही (Spike Protein) 13 वेळा म्यूटेशन झालं. स्पाइक प्रोटीनची ओळख करुनच बहुतेक लसी परिणाम करत असतात. अद्याप याबाबतची माहिती मिळालेली नाही, की या महिलेतून हे म्यूटेशन इतर कोणामध्ये ट्रान्समिट झालं आहे का? याबाबतचा एक रिसर्च प्री-प्रिंट जर्नल medRxiv मध्ये प्रकाशित झाला आहे. या स्टडीमध्ये लेखक टूलियो डि ओलिवीरा (Tulio de Oliveira) यांनी म्हटलं आहे, की अशीच आणखी प्रकरणं आढळली तर हे समजू शकेल की HIV इन्फेन्शन नव्या व्हेरियंटचा सोर्स ठरू शकतं. 

रुग्णांमध्ये कोरोना व्हायरस बराच काळ राहू शकतो. यातून त्याला म्यूटेट होण्याची संधी मिळते. ते म्हणाले, की या केसबाबत कदाचित कोणालाही समजलंदेखील नसतं कारण सुरुवातीच्या उपचारानंतर महिलेमध्ये कमी लक्षणं होती. मात्र, व्हायरस तिच्या शरीरात होता. रिपोर्टनुसार, या प्रकरणाची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा ही महिला 300 HIV पॉझिटिव्ह लोकांबाबत केलेल्या स्टडीमध्ये सहभागी झाली. यात असंही समोर आलं, की या महिलेशिवाय चार आणखी लोक असे होते, ज्यांच्या शरीरात कोरोना एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, अशा लोकांमध्येही बराच काळ कोरोनाचा प्रादुर्भाव राहात असल्याचं पाहिलं गेलं आहे. 

कोरोनाबाबतचं हे प्रकरण त्यापेक्षा अत्यंत वेगळं आहे. हा रिसर्च खूप महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः आफ्रिकेसाठी कारण याठिकाणी 2020 मध्ये तब्बल 2 कोटीहून अधिक लोकांना HIV होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या विळख्यात आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाऊन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. 

Read in English

Web Title: CoronaVirus Live Updates hiv positive woman hosted coronavirus for 216 days during this period virus mutated 32 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.