CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,257 नवे रुग्ण; 42 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 11:21 AM2022-07-10T11:21:04+5:302022-07-10T11:32:20+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपासून देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 18,257 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 42 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
रविवारी (10 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,25,428 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी लाखो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर अनेक जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे.
#COVID19 | India reports 18,257 fresh cases, 14,553 recoveries and 42 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 10, 2022
Active cases 1,28,690
Daily positivity rate 4.22% pic.twitter.com/eKWeVYDlen
कोरोना टेस्टला चकवा देऊ शकतो नवा सब व्हेरिएंट; प्रशासनाची वाढली चिंता
कोरोना व्हायरसच्या नवीन सब व्हेरिएंटने आता पुन्हा एकदा देशातील शास्त्रज्ञांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाचा हा नवीन सब व्हेरिएंट सध्याच्या तपास पद्धतींना चकवा देऊ शकतो. सध्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजेन किटद्वारे चाचणी केली जात आहे. नवी दिल्लीस्थित IGIB च्या संशोधकांचा असा विश्वास आहे की कोरोनाचे सर्व प्रकार समोर आल्यानंतर चाचणी पद्धतींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. लॅबमध्ये कोरोना चाचणी किटसह फ्रिक्वेन्सी तपासल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली आहे.
देशातील बहुतांश राज्ये सध्या रॅपिड अँटीजन किट वापरत आहेत. तर कोरोना BA.4, BA.5 आणि BA.2.75 चे नवीन सब व्हेरिएंट कोरोना चाचणीच्या पॅरामीटर्सवर परिणाम करू शकतात. IGIB वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विनोद स्करिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे की सब व्हेरिएंट ba.2.75 मधील म्युटेशन कोरोना व्हायरस शोधण्याच्या पॅरामीटर्सवर परिणाम करू शकते. इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये असे दिसून आले आहे की रॅपिड अँटीजेनच्या वापरामुळे तेथे संक्रमणाचे स्त्रोत गायब झाले आहेत.