CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? गेल्या 24 तासांत 20,139 नवे रुग्ण; मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:13 AM2022-07-14T11:13:33+5:302022-07-14T11:22:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.

CoronaVirus Live Updates India reports 20,139 fresh cases and 38 deaths in the last 24 hour | CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? गेल्या 24 तासांत 20,139 नवे रुग्ण; मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? गेल्या 24 तासांत 20,139 नवे रुग्ण; मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार कोटींवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज 14 हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गुरुवारी (14 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 20,139 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,25,557 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना कोरोना मृतांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. पण पुन्हा रुग्णसंख्येत आणि मृतांच्या आकड्यात वाढ होत असल्याने चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. लसीकरण मोहिम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन सब व्हेरिएंटने आता पुन्हा एकदा देशातील शास्त्रज्ञांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाचा हा नवीन सब व्हेरिएंट सध्याच्या तपास पद्धतींना चकवा देऊ शकतो.

सध्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजेन किटद्वारे चाचणी केली जात आहे. नवी दिल्लीस्थित IGIB च्या संशोधकांचा असा विश्वास आहे की कोरोनाचे सर्व प्रकार समोर आल्यानंतर चाचणी पद्धतींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. लॅबमध्ये कोरोना चाचणी किटसह फ्रिक्वेन्सी तपासल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली आहे. देशातील बहुतांश राज्ये सध्या रॅपिड अँटीजन किट वापरत आहेत. तर कोरोना BA.4, BA.5 आणि BA.2.75 चे नवीन सब व्हेरिएंट कोरोना चाचणीच्या पॅरामीटर्सवर परिणाम करू शकतात. इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये असे दिसून आले आहे की रॅपिड अँटीजेनच्या वापरामुळे तेथे संक्रमणाचे स्त्रोत गायब झाले आहेत.
 

Web Title: CoronaVirus Live Updates India reports 20,139 fresh cases and 38 deaths in the last 24 hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.