CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:28 AM2021-09-21T10:28:47+5:302021-09-21T10:30:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. याच दरम्यान आता दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे.

CoronaVirus Live Updates India reports 26,115 new COVID19 cases, 252 deaths in last 24 hrs | CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा सर्वच देशांत उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 22 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. याच दरम्यान आता दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत असताना सुखावणारी आकडेवारी पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. 

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी (21 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 252 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,45,385 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,09,575 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,27,49,574 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशामध्ये एकूण 81,85,13,827 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

धोका वाढला! सणसमारंभाच्या काळात डेल्टा व्हेरिएंटचा कहर?; येणारे 3 महिने ठरू शकतात घातक

सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. 

सणांमध्ये निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा

ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालून शकतो. जर लोकांनी सणसमारंभामध्ये कोरोना नियमावलीचं पालन केलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या संकटात एक आनंदाची बातमी दिली आहे. WHO ने दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच बळींच्या संख्येतही घट झाली आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates India reports 26,115 new COVID19 cases, 252 deaths in last 24 hrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.