CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत 30,549 नवे रुग्ण, 422 जणांचा मृत्यू; 3 कोटींचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 10:17 AM2021-08-03T10:17:12+5:302021-08-03T10:19:21+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल तीन कोटीवर गेला आहे. तर कोरोना बळींची संख्या चार लाख झाली आहे.

CoronaVirus Live Updates India reports 30,549 new COVID19 cases 422 deaths in last 24 hours | CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत 30,549 नवे रुग्ण, 422 जणांचा मृत्यू; 3 कोटींचा टप्पा पार

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत 30,549 नवे रुग्ण, 422 जणांचा मृत्यू; 3 कोटींचा टप्पा पार

googlenewsNext

नवी दिल्ली - संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल तीन कोटीवर गेला आहे. तर कोरोना बळींची संख्या चार लाख झाली आहे. रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत होती. मात्र आता थो़डा दिलासा मिळाला आहे. सहा दिवसांनंतर कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 30 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 422 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (3 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 422 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,17,26,507 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,25,195 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,04,958 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,08,96,354 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  लसीकरण मोहीम सुरू असून कोट्य़वधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. 

भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक; 3 पैकी एकाचा होईल मृत्यू, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

कोरोनाबाबत आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक असून 3 पैकी एकाचा मृत्यू होईल असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांनी हा गंभीर इशारा दिला आहे. गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं सर्वात जास्त खतरनाक रुप आता समोर आलं आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीन पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. सायंटिफिक एडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिपोर्टनुसार, कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट MERS व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणं अटळ आहे.

चिंता वाढली! दुसऱ्या लाटेत कोरोनाने महिलांवर केला सर्वाधिक अटॅक; वेळीच व्हा सावध

कोरोनाची दुसरी लाट महिलांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. दुसऱ्या लाटेत पुरुषांपेक्षा जास्त महिलांना संसर्ग झाल्याची माहिती आता समोर आली आहे. गेल्या वर्षी पहिल्या लाटेत वृद्ध सर्वाधिक बळी पडले होते. मात्र यावर्षी दुसऱ्या लाटेत महिला आणि तरुणांनाही अधिक संसर्ग होत आहे. आरोग्य विभागाच्या मते, दुसऱ्या लाटेत एकूण संक्रमित रुग्णांमध्ये 52.5 टक्के महिला आहेत. जानेवारी ते जुलै पर्यंत 52.5 टक्के महिलांना संसर्ग झाला आहे. एकूण संक्रमित लोकांपैकी 58.8 टक्के पुरुष आहेत. म्हणजेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एकूण संक्रमित रुग्णांपैकी 58 टक्के पुरुष तर 52 टक्के महिलांना संसर्ग झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्त्रियांमध्ये संसर्ग वाढण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे व्हायरसचं म्युटेशन हे आहे. त्याच्या स्वरुपात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे महिलांव्यतिरिक्त तरुण देखील मोठ्या प्रमाणात व्हायरसला बळी पडत आहेत.

Web Title: CoronaVirus Live Updates India reports 30,549 new COVID19 cases 422 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.