CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,750 नवे रुग्ण, 123 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 10:29 AM2022-01-03T10:29:12+5:302022-01-03T10:39:10+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात धोका वाढला असून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 29 कोटींच्या वर गेली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात धोका वाढला असून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. दिवसागणिक आकडा वाढत असून एकूण रुग्णांची संख्या 1700 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने देखील चिंतेत भर टाकली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 33,750 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (3 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाख 81 हजारांवर पोहोचला आहे. रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 3,42,95,407 लोक बरे झाले आहेत. तर कोट्यवधील लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
India reports 33,750 fresh COVID cases, 10,846 recoveries, and 123 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) January 3, 2022
Active cases: 1,45,582
Total recoveries: 3,42,95,407
Death toll: 4,81,893
Total vaccination: 1,45,68,89,306 pic.twitter.com/L3NUkNZoFt
देशाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 1.68 टक्क्यांवर आहे. ओमायक्रॉन वेगाने पसरत असून आता 1700 जणांना लागण झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नवी लाट येऊ शकते अशी माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. ही लाट काही दिवसांसाठी असेल पण ती मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्गित करेल असं म्हटलं आहे. ओमायक्रॉनचा भारतात आता कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
अधिकाधिक नागरिकांना ओमायक्रॉनची लागण होण्याची भीती
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून येत्या काही दिवसांत रुग्णवाढीचा दर वेगाने वाढणार आहे, असा इशारा केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची अल्प काळातील लाट येऊन अधिकाधिक नागरिकांना ओमायक्रॉनची लागण होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिजनेस स्कूलमधील प्रा. पॉल कट्टूमन यांनी "कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित केला असून एका ई-मेलमध्ये त्यांनी लिहिले आहे, येत्या काही दिवसांत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढेल. कदाचित या आठवडय़ातही वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत किती वाढ होईल, हे आता सांगणे कठीण आहे" असं देखील म्हटलं आहे. कट्टूमन आणि त्यांचा संशोधक गट गेल्या काही दिवसांतील भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहेत.
Number of confirmed #Omicron cases in India reaches 1,700: Union Health Ministry pic.twitter.com/Sx2Tu77dGX
— ANI (@ANI) January 3, 2022