CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! मृतांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला; गेल्या 24 तासांत 4205 जणांनी जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:10 AM2021-05-12T10:10:58+5:302021-05-12T10:31:21+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांत पहिल्यांदाच कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिकेसारखा देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 15 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांत पहिल्यांदाच कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. याआधी 7 मे रोजी कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तब्बल 4205 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी (12 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,48,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,33,40,938 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,04,099 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,93,82,642 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
India reports 3,48,421 new #COVID19 cases, 3,55,338 discharges and 4205 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) May 12, 2021
Total cases: 2,33,40,938
Total discharges: 1,93,82,642
Death toll: 2,54,197
Active cases: 37,04,099
Total vaccination: 17,52,35,991 pic.twitter.com/fMKoTwf0kk
आशेचा किरण! महाराष्ट्र, दिल्लीसह 18 राज्यांत कमी होतोय कोरोनाचा कहर पण 'या' राज्यांमुळे चिंतेत भर
गेल्या काही दिवसांमध्ये दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलासा देणारी माहिती दिली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्लीसह देशातील एकूण 18 राज्यांमधील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. तसंच देशाचा पॉझिटिव्हिटी दर सरासरी 21 टक्के इतका आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदीगड, लडाख, दीव-दमण, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार यांचा या 18 राज्यांमध्ये समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडं टेन्शन! कोरोनाच्या संकटात 'ही' आकडेवारी सुखावणारी तर 'ही' धडकी भरवणारी#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/cEqkSe0LXP
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2021
कोरोनाचा वेग मंदावत असताना काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, आणि अरुणाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. देशातील 13 राज्यांमध्ये 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 6 राज्यांमध्ये 50 ते 1 लाखांवर सक्रिय रुग्ण आहेत. आणि 17 राज्यांमध्ये 50 हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने देशाचा पॉझिटिव्हिटी दर हा कमी होत असल्याचे संकेत आहेत. हा दर आता 21 टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचे थैमान! रेल्वेच्या तब्बल 1952 कर्मचाऱ्यांचा मृत्यू#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#IndianRailwayshttps://t.co/pzQ106Jmbv
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2021
CoronaVirus Live Updates : बापरे! ऑक्सिजन अभावी 7 कोरोनाग्रस्तांना गमवावा लागला जीव #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#OxygenCylinder#OxygenCrisishttps://t.co/B9ttmJgwD9
— Lokmat (@MiLOKMAT) May 10, 2021