CoronaVirus Live Updates : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,157 नवे रुग्ण; 518 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 10:05 AM2021-07-18T10:05:00+5:302021-07-18T10:05:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान दिलासा मिळाला आहे.

CoronaVirus Live Updates India reports 41,157 new COVID cases and 518 deaths during last 24 hours | CoronaVirus Live Updates : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,157 नवे रुग्ण; 518 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Live Updates : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,157 नवे रुग्ण; 518 जणांचा मृत्यू 

Next

नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 41,157 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 518 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 4,13,609 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (18 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 3 कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4 लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,22,660 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,02,69,796 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक रिसर्च केले जात आहेत. रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात येत आहे. अशीच एक धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना हेल्थ कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत. भयंकर बाब म्हणजे किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होत आहे,. लँसेटच्या रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. लँसेटच्या रिपोर्टने चिंतेत भर टाकली आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात जवळपास 50 टक्के रुग्णांमध्ये काहीनाकाही आरोग्य विषयक समस्या आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. लँसेटच्यावतीने यूकेमध्ये 73197 लोकांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या 49.7 टक्के रुग्णांमध्ये काहीना काही आरोग्यविषयक समस्या या होत्या. तसेच बरं झाल्यावर देखील अशीच परिस्थिती होती. 

बापरे! कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना आरोग्यविषयक समस्या; किडनी-लिव्हरवर गंभीर परिणाम, रिपोर्टमधून मोठा खुलासा

कोरोनावर मात केल्यानंतर देखील अनेक लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळाली. कोरोनाचा तरुणांवर अधिक गंभीर परिणाम होत असल्याचं या रिपोर्टमध्ये विशेष नमूद करण्यात आलं आहे. 19 ते 29 वर्षे वयोगटातील 27 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर देखील ते खूप वेळ आजारी होते. त्यांच्यामध्ये लाँग कोविडची लक्षणं पाहायला मिळाली. त्यामुळेच त्यांच्या शरिरातील अवयवांवर याचा परिणाम झाला आहे. किडनी आणि लिव्हरवर याचा सर्वात जास्त परिणाम होत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या लोकांमध्ये कार्डियक एरिद्मिया हा आजार आढळून आला आहे. तसेच अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. कोरोनासह दुसऱ्या आजाराचा सामना करत असलेल्या तरुणांना मृत्यूचा धोका अधिक असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तसेच कोरोनावर आणखी संशोधन झालं पाहिजे असं देखील लँसेटने म्हटलं आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates India reports 41,157 new COVID cases and 518 deaths during last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.