CoronaVirus Live Updates : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, नवा उच्चांक गाठला; तब्बल 4 लाख नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:18 AM2021-05-06T10:18:05+5:302021-05-06T10:21:58+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 15 कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेत भर पडत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने गेल्या काही महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (6 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 4,12,262 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,10,77,410 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 23,01,68 वर पोहोचला आहे. रिपोर्टनुसार, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 35,66,398 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या संकटात दिलासादायक बाब म्हणजे 1,72,80,844 लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे.
India reports 4,12,262 new #COVID19 cases, 3,29,113 discharges and 3,980 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) May 6, 2021
Total cases: 2,10,77,410
Total recoveries: 1,72,80,844
Death toll: 23,01,68
Active cases: 35,66,398
Total vaccination: 16,25,13,339 pic.twitter.com/W1kQnSucGe
केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी माहिती दिली. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. भारतात करोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे असं म्हटलं आहे. "सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं" असं राघवन यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! "तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/PnmMo4iLRy
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2021
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,82,315 रुग्ण आढळले आहेत. अशी 12 राज्ये आहेत जिथे 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 7 राज्यांत 50,000 ते 1,00,000 सक्रिय रुग्ण आहेत. तर 17 राज्यांत 50,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे पॉझिटिव्हीची रेट हा 15 टक्क्यांहून अधिक आहे. अग्रवाल यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये मृत्यूची संख्या अधिक असल्याचं म्हटलं आहे. तसेच काही ठिकाणी चिंताजनक परिस्थिती आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
CoronaVirus Live Updates : "ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू होणं आमच्यासाठी वेदनादायी"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#OxygenCylindershttps://t.co/DM2kaC3D6Vpic.twitter.com/BXyzJRFlOg
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2021
CoronaVirus Live Updates : काही जणांच्या हलगर्जीपणामुळे इतरांचाही जीव धोक्यातhttps://t.co/gN8siUv7jB#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2021