CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 42,766 नवे रुग्ण; रिकव्हरी रेट 97.42 टक्क्यांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 10:24 AM2021-09-05T10:24:50+5:302021-09-05T10:36:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज 40 हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.

CoronaVirus Live Updates India reports 42,766 new cases in the last 24 hours | CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 42,766 नवे रुग्ण; रिकव्हरी रेट 97.42 टक्क्यांवर 

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 42,766 नवे रुग्ण; रिकव्हरी रेट 97.42 टक्क्यांवर 

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटीवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज 40 हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (5 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 42,766 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटी 21 लाख 38 हजार 92 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाख 10 हजार 48 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 97.42 टक्क्यांवर आहे. 

"कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीच्या तीन डोसची आवश्यकता"; तज्ज्ञांचा मोठा दावा

कोरोना लसीचे सामान्यतः दोन डोस जगभरात दिले जात आहेत. अमेरिकेसह काही देशांमध्ये, हाय रिस्क असलेल्या लोकांना लसीचे तीन डोस देखील दिले जात आहेत. पण आता डॉक्टर अँथनी फौसी यांनी लोकांना येत्या काळात कोरोना लसीच्या तीन डोसची आवश्यकता असू शकते असं म्हटलं आहे. त्यांच्या मते, दोन डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी कमी होत आहेत. त्यांनी या संबंधित काही डेटा देखील दाखवला आहे. फौसी यांनी इस्रायलचा डेटा शेअर केला. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने लोकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, 10 लाख लोकांना ज्यांना लसीचे तीन डोस देण्यात आले आहेत. त्यांच्यावर त्यांचा खूपप चांगला परिणाम झाला आहे. या सर्वांना फायझरची लस देण्यात आली. 

"ज्यांना लसीचा तिसरा डोस देण्यात आला, त्यांना कोरोना होण्याचा धोका फक्त 10 टक्के"

कोरोना लस दिल्यानंतर 12 दिवसांनी त्याच्यावर रिसर्च करण्यात आला. यानुसार ज्यांना लसीचा तिसरा डोस देण्यात आला, त्यांना कोरोना होण्याचा धोका फक्त 10 टक्के राहिला आहे. तसेच अमेरिकेत 20 सप्टेंबरपासून बूस्टर डोस दिले जातील. लसीचा तिसरा डोस दुसऱ्या डोसनंतर 8 महिन्यांनी दिला जाईल. अमेरिकेतील बहुतेक लोकांना फायझर आणि मॉडर्नाची लस देण्यात आली आहे. या दोन्ही लसींचे पहिले दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातात. यापूर्वी अमेरिकेत फक्त हाय रिस्क असलेल्या रुग्णांना बूस्टर डोस देण्याची परवानगी देण्यात आली होती.

Web Title: CoronaVirus Live Updates India reports 42,766 new cases in the last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.