CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:48 AM2021-03-25T09:48:16+5:302021-03-25T10:05:33+5:30
CoronaVirus Live Updates India reports 53,476 new COVID19 cases and 251 deaths in last 24 hours: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिकेसारखा देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 11 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.
CoronaVirus Live Updates India reports 53,476 new COVID19 cases and 251 deaths in last 24 hours"
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 53,476 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 251 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,17,87,534 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
India reports 53,476 new #COVID19 cases, 26,490 recoveries, and 251 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
— ANI (@ANI) March 25, 2021
Total cases: 1,17,87,534
Total recoveries: 1,12,31,650
Active cases: 3,95,192
Death toll: 1,60,692
Total vaccination: 5,31,45,709 pic.twitter.com/MHqvScsPDS
गुरुवारी (25 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53,476 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,17,87,534 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,60,692 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,95,192 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,12,31,650 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा वेग वाढतोय! रुग्णांची संख्या तब्बल 1 कोटीवर, दीड लाख लोकांचा मृत्यूhttps://t.co/sG7n8iTEUB#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 24, 2021
चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ
देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 504.4 दिवसांवरून 202.3 दिवसांवर आला आहे. 1 मार्चला हा कालावधी 504 दिवस होता तो आता 23 मार्चला तो 202 दिवस झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहा राज्यांत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांचे प्रमाण एकूण देशातील प्रमाणाच्या 80.90 टक्के आहे. 22 मार्चला 32.53 लाखांहून अधिक लोकांनी लसीचा डोस देण्यात आला आहे. एकाच दिवसातील ही सर्वांत मोठी संख्या आहे. महाराष्ट्रानंतर पंजाबमध्ये 2,299 रुग्ण असून गुजरातेत 1,640 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक , हरियाणा व राजस्थान या राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारीच्या मध्यावधीत भारतात नीचांकी रुग्ण संख्या होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स 1 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत लागू होणार आहेत.
कोरोनाचा हाहाकार! रुग्णालयामध्ये आयसीयू बेडची कमतरता, आतापर्यंत जवळपास 3,00,000 लोकांना गमवावा लागला जीव https://t.co/a9kKcLr9Eo#coronavirus#CoronaVirusUpdates#Brazil
— Lokmat (@MiLOKMAT) March 24, 2021