CoronaVirus Live Updates : कोरोनाचा नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 72,330 नवे रुग्ण, 459 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 10:21 AM2021-04-01T10:21:44+5:302021-04-01T10:37:12+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
नवी दिल्ली - कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा संपूर्ण जग सध्या सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 12 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 1,22,21,665 वर गेला आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (1 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 72,330 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 459 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,22,21,665 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,62,927 पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,84,055 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,14,74,683 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.
India reports 72,330 new #COVID19 cases, 40,382 discharges, and 459 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
— ANI (@ANI) April 1, 2021
Total cases: 1,22,21,665
Total recoveries: 1,14,74,683
Active cases: 5,84,055
Death toll: 1,62,927
Total vaccination: 6,51,17,896 pic.twitter.com/zoMlMyXlKj
कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद
कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 15 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य प्रदेशमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने 1 ली ते 8 वीपर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. मध्य प्रदेश सरकारने बोर्डाच्या परीक्षांचा विचार करुन 18 डिसेंबरपासून 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार विद्यार्थी आपल्या पालकांचं संमतीपत्र सादर करुन शाळेत उपस्थित राहू शकत होते.
CoronaVirus News : शाळा सुरू करणं पडू शकतं महागात, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतला निर्णय https://t.co/OgiNwFXhUx#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 31, 2021
मोठा दिलासा! आता पाळीव प्राणीही कोरोनापासून राहणार सुरक्षित; 'या' देशाने बनवली पहिली लस
कोरोनाचा पाळीव प्राण्यांना देखील धोका आहे. कोरोनाच्या नवा स्ट्रेनपासून जगभरातील पाळीव प्राणी देखील वाचू शकलेले नाहीत. मात्र आता कोरोनाच्या महाभयंकर संकटात एक दिलासादायक घटना समोर आली आहे. पाळीव प्राण्यांनाही कोरोना होऊ नये म्हणून रशियाने चक्क पाळीव प्राण्यांसाठी कोरोनाची लस तयार केली आहे. त्यामुळे कोरोनापासून पाळीव प्राण्यांचं संरक्षण होणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित रोजेलखोनाजोर या संस्थेने याबाबतची घोषणा केली आहे. श्वान, मांजर, बर्फाळ भागात राहणारे कोल्हे, उंदीर, कोल्हा आणि इतर प्राण्यांवर या Carnivac-Cov लसीची क्लिनीकल ट्रायल करण्यात आली आहे. ही ट्रायल गेल्यावर्षी ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्याआधारे ही लस प्राण्यांसाठी सुरक्षित आणि संरक्षक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
CoronaVirus News : धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिद्वारमध्ये कोरोनाचा उद्रेक, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढhttps://t.co/IJ4u7n1vn9#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#KumbhMela2021#KumbhHaridwar2021#Uttarakhand
— Lokmat (@MiLOKMAT) March 31, 2021
CoronaVirus Vaccine : पाळीव प्राण्यांनाही कोरोनाचा धोका! लसीमुळे होणार संरक्षणhttps://t.co/h7BIqZpTMT#Corona#CoronaVirusUpdates#CoronaVaccine#CoronaUpdate#Animal
— Lokmat (@MiLOKMAT) March 31, 2021