CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! आता कोरोनाग्रस्तांसाठी मोबाईलवर बुक होणार बेड; फोनवरच डॉक्टर देणार सल्ला; 'या' राज्यात सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:30 PM2021-05-08T17:30:22+5:302021-05-08T17:37:57+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील कोरोना रुग्णांना बेडची सुविधा आता मोबाईलवर उपलब्ध होऊ शकणार आहे. यासोबतच डॉक्टरांचा सल्ला हा व्हॉट्सअॅप क्रमांकावरही मिळू शकेल.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दोन कोटींवर पोहोचली आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान झारखंडमधील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांना बेडची सुविधा आता मोबाईलवर उपलब्ध होऊ शकणार आहे. यासोबतच डॉक्टरांचा सल्ला हा व्हॉट्सअॅप क्रमांकावरही मिळू शकेल. मुख्यमंत्री हेमंन सोरेन यांनी राज्यात वाढणाऱ्या संसर्गादरम्यान नागरिकांना तातडीने सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमृतवाहिनी वेबसाईट, मोबाईल अॅप आणि चॅटबोटचं उद्धाटन केलं आहे. याच्या माध्यमातून रुग्ण आता रुग्णालयात ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर आयसीयू बेड ऑनलाईन बुक करू शकतात. सोबतच व्हॉट्सअॅप चॅटबोटच्या माध्यमातून डॉक्टरांशी चर्चा करीत कोरोनाशी संबंधित माहिती घेऊ शकतात.
CoronaVirus Live Updates : "आम्ही बेडसाठी आणखी दोन तास वाट पाहू पण आमचा बेड या तरुणाला द्या"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/WgaClzqdNe
— Lokmat (@MiLOKMAT) May 8, 2021
मुख्यमंत्र्यांनी लोकांना आग्रह केला आहे की, त्यांनी सर्दी, ताप याकडे दुर्लक्ष करू नये. ही कोरोनाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. जर कोणामध्ये ही लक्षणं दिसत असतील तर त्यांनी आयसोलेट व्हावं आणि लवकरात लवकर टेस्ट करून घ्यावी. यातून तुम्ही स्वत:चा जीव तर वाचवू शकालच शिवाय कुटुंबालाही सुरक्षित ठेवू शकाल.नागरिकांनी अमृतवाहिनी वेबसाईट आणि अॅपवर राज्यातील सर्व सरकार आणि खासगी रुग्णालयात कोविड बेड, ऑक्सिजन बेड, आयसीटू बेड आणि व्हेंटिलेटर बेड्सच्या उपलब्धतेची रिअल टाईम माहिती द्यावी. या माध्यमातून ऑनलाईन बुकिंगची सुविधाही मिळेल.
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनामुळे भयंकर इन्फेक्शन; वेळेत उपचार झाले नाहीत तर रुग्णांना गमवावे लागताहेत डोळे #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/0winvlSqKe
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021
जे कोरोना रुग्ण आयसोलेशनमध्ये आहेत, ते या माध्यमातून कोरोना मेडिकल किट घेऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सअॅप चॅटबोड नंबर 8595524447 वर डॉक्टरांच्या सल्लाने करता येऊ शकते. यासोबत औषधं, डाएट चार्ट, जिल्हा कंट्रोल रुममध्ये संपर्क, प्लाझ्मा डोनेट, होम आयसोलेशन किट संबंधित माहितीही घेऊ शकता. रुग्णालय रेमेडेसिवीर आणि अन्य औषधांची मागणी अॅपच्या माध्यमातूनही करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,18,92,676 वर पोहोचला आहे.
"हे विक्रीसाठी नाही तर फक्त सरकारी पुरवठा"; इंजेक्शनच्या बॉक्सवरील मजकुराने सर्वच हैराण#CoronavirusIndia#CoronavirusCrisis#coronavirus#Remdesevir#remdesivirinjectionhttps://t.co/ZONM7I3um3
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021
CoronaVirus Live Updates : कोरोनाचे थैमान! गेल्या वर्षी 734 डॉक्टर्सचा मृत्यू; रुग्णांच्या संख्येने वाढवली चिंता#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/rlmurxo5Di
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2021