CoronaVirus Live Updates : "मी आयुष्यभर मातृभूमीची सेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही"; कारगिल युद्धातील जवानाचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 01:16 PM2021-04-30T13:16:06+5:302021-04-30T13:26:31+5:30

CoronaVirus Live Updates Kargil hero loses son in UP, says 'I served nation, system couldn't save my son : गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

CoronaVirus Live Updates Kargil hero loses son to Covid in UP, says 'I served nation, system couldn't save my son | CoronaVirus Live Updates : "मी आयुष्यभर मातृभूमीची सेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही"; कारगिल युद्धातील जवानाचा आक्रोश

CoronaVirus Live Updates : "मी आयुष्यभर मातृभूमीची सेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही"; कारगिल युद्धातील जवानाचा आक्रोश

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसतं-खेळतं घर कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक घटना घडली आहे. "मी आयुष्यभर देशसेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही" असं म्हणत कारगिल युद्धातील जवानाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. CoronaVirus Live Updates - Kargil hero loses son in UP, says 'I served nation, system couldn't save my son 

कारगिल युद्धातील सुभेदार मेजर (निवृत्त) हरी राम दुबे यांना कोरोनामुळे आपला मुलगा गमवावा लागला आहे. दुबे यांनी आपल्या 31 वर्षीय मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी कित्येक तास वाट पाहावी लागली असल्याचं देखील सांगितलं आहे. "मी 1981 ते 2011 पर्यंत आपल्या मातृभूमीची सेवा केली. कारगिल ते बारामुल्ला, लडाख ते लुकुंग येथे मी कर्तव्य बजावलं. मी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांना ठार केलं आणि कारगिलमध्ये पाकिस्तानविरोधात लढा दिला. पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही. मंगळवारी संध्याकाळी त्याचं करोनाने निधन झालं" असं हरी राम दुबे यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आपल्या मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी दुबे यांना आपली पत्नी, मुलगी आणि सुनेसोबत कित्येक तास वाट पहावी लागली. नंतर अखेर कुटुंबाला पीपीई किट घालून मृतदेह पाहण्याची परवानगी देण्यात आली. "मी केलेल्या कामाबद्दल लष्कर प्रमुखांकडून प्रमाणपत्र देऊन माझा गौरव करण्यात आला होता. मी कारगिल युद्धात सहभागी होतो. मी दहशतवाद्यांशी लढलो, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही आणि आता कागदपत्रांसाठी पळवत आहेत. माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे आणि ही वागणूक म्हणजे छळ आहे" असं देखील दुबे यांनी सांगितलं आहे. 

धक्कादायक! भाजपा आमदाराचा कोरोनाने झाला मृत्यू; 24 तास मिळाला नव्हता ICU बेड

कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. एका भाजपा आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराला 24 तास ICU बेड मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) बरेलीतील (bareilly) भाजपा आमदार केसर सिंह गंगवार (BJP Kesar Singh Gangwar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिलला गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्यांना 24 तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलावर आली आईचा मृतदेह स्मशानात बाईकवरुन नेण्याची वेळ

 आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. आईचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका अथवा इतर वाहन न मिळाल्याने एका मुलावर बाईकवरून मृतदेह नेण्याची वेळ आली आहे. मुलाने बाईकवरून आपल्य़ा आईचा मृतदेह हा स्मशानभूमीत नेला आणि अंत्यसंस्कार केले आहेत. सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जी चेन्चुला असं 50 वर्षीय महिलेचं नाव आहे. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे तिच्या अंत्यसंस्कारासाठी लेकाला काही समस्यांना सामोरं जावं लागलं. महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे होती. त्यांची चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट येण्याआधीच तिची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला.

Web Title: CoronaVirus Live Updates Kargil hero loses son to Covid in UP, says 'I served nation, system couldn't save my son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.