अरे देवा! कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केलं होम-हवन, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:36 PM2021-05-25T20:36:57+5:302021-05-25T20:40:27+5:30
Karnataka BJP MLA Organises Havans To Stop Corona Spread : कोरोना पळवून लावण्यासाठी एका आमदाराने होम-हवन केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे (Corona Virus) आतापर्यंत देशभरात तब्बल दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान काही राजकीय पक्षाचे नेते हे कोरोनासंदर्भात वादग्रस्त विधानं करत आहेत. तसेच अजब उपाय सांगून कोरोनाला पळवून लावा असा दावा देखील करत आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी एका आमदाराने होम-हवन केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील एका भाजपा आमदाराने कोरोनाला पळवून लावण्यासाठी होम-हवन केले. तसेच ते यज्ञकुंड एका ट्रॉलीमध्ये ठेवून संपूर्ण शहरात देखील फिरवलं आहे. बेळगावमध्ये ही घटना घडली आहे. ज्या परिसरात आमदारांना पोहचणं शक्य झालं नाही. तेथे त्यांनी वेगळं होमहवन करण्याचं आयोजन केलं. कोरोनापासून शहराची सुटका व्हावी म्हणून हे करत असल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी कोरोनामुळे आतापर्यंत 500 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण बेळगावमधीलभाजपा आमदार अभय पाटील यांच्या वतीने कोरोनाला पळवून लावण्यासाठी विशेष हवन करण्याचं आयोजन करण्यात आलं.
"वेगाने लसीकरण केल्यानंतरही आजाराचा धोका संपणार नाही"; WHO प्रमुखांच्या विधानाने वाढवली चिंता#coronavirus#CoronaPandemic#WHO#Tedroshttps://t.co/OvcSUWnl6F
— Lokmat (@MiLOKMAT) May 25, 2021
अभय पाटील यांनी यज्ञ आणि हवन यांच्यामुळे वातावरणाचं शुद्धीकरण होतं. वैज्ञानिक दृष्ट्यादेखील ही बाब सिद्ध झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत येथे सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच त्यामुळेच प्रत्येक घरासमोर हवन करण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये शंखनाद आणि होम-हवनाच्या धुरांमुळे कोरोनाचा संसर्ग नष्ट करण्याची तयारी केली गेली होती. भाजपाचे नेते गोपाल शर्मा (BJP Gopal Sharma) यांनी कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी वेगळाच उपाय केला होता. गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो असे म्हटलं होतं. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला असून तो जोरदार व्हायरल झाला होता.
CoronaVirus News : देशात ब्लॅक फंगसचा कहर, वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर#coronavirus#CoronaSecondWave#CoronavirusIndia#Mucormycosis#BlackFungus#hospital#ICMRhttps://t.co/MZmeK7QX24
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2021
गोपाल शर्मा हे या व्हिडीओमध्ये सायकलवर एक यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरताना दिसले होते. यज्ञामध्ये गोवऱ्या, देशी गायीचे तूप, आंब्याच्या झाडांच्या काड्या, कापूर हे सगळं एकत्र करून हवन पेटवण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली होती. यज्ञ कुंडातील धुरामधून वातावरणातील हवा शुद्ध होते आणि धोकादायक व्हायरस नष्ट होतो. तसेच ऑक्सिजनचं प्रमाण देखील वाढते असा दावाही गोपाल शर्मा यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी देखील गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नसल्याचा दावा केला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार! नर्स आणि डॉक्टरचा पत्ताच नाही...#coronavirus#CoronavirusIndia#CoronavirusPandemic#Cowhttps://t.co/1gSP7ML1ey
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2021