CoronaVirus Live Updates : कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारने 7 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:51 PM2021-05-21T19:51:11+5:302021-05-21T20:02:48+5:30
Karnataka Covid lockdown State extends lockdown till June 7 : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन हा 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,60,31,991 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,591 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,209 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,91,331 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन (Karnataka Covid lockdown) हा 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 24 मे पर्यंत राज्यात क़डक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे 7 जून पर्यंत वाढवण्यात आलं आहे. कोरोना संकटात कर्नाटक सरकारने (Karnataka Government-) गरजूंसाठी आपली तिजोरी उघडली आहे. तब्बल 1250 कोटींच्या कोविड रिलीफ पॅकेजची (Relief Package) मोठी घोषणा केली आहे. कर्नाटक सरकारने आता 1250 कोटी रुपयांचं कोविड रिलीफ पॅकेज जाहीर केलं आहे.
We had a meeting with senior officials and ministers. We have taken a decision on lockdown. We had strict restrictions till 24th May. As per the opinion of experts, we are extending the strict restrictions till 7th June at 6 am: Karnataka CM BS Yediyurappa
— ANI (@ANI) May 21, 2021
(File photo) pic.twitter.com/wZqu2O52G8
कोरोना संकटात "या" सरकारने गरजूंसाठी उघडली तिजोरी; 1250 कोटींच्या Relief Package ची मोठी घोषणा
रिलीफ पॅकेजच्या माध्यमातून बांधकामाशी संबंधित कामगार, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, फिल्मलाईनमधले वर्कर्स, फुटपाथवर भाज्या-फळे विकणारे लोक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजू लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी या रिलीफ पॅकेजची घोषणा केली आहे. वरिष्ठ अधिकाऱी आणि कॅबिनेट मंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या सरकारने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळातही असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत दिली होती. आता पुन्हा एकदा ती देणार असल्याची घोषणा करत असल्याचं म्हटलं आहे.
शेतकऱ्यांसह असंघटित क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहत आहे. त्यामुळे आम्ही 1250 कोटींहून अधिकचं पॅकेज जाहीर करत आहोत, असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितलं. तसेच आम्ही जे काही करु शकत होतो ते आम्ही केलं आहे आणि यापुढेही गरज लागल्यास आम्ही करायला तयार आहोत असंही म्हटलं आहे. नोंदणीकृत बांधकाम कर्मचारी आणि मजुरांना प्रत्येकी 3000 रुपयांचं अर्थसाहाय्य दिलं जाणार आहे. हे एकूण पॅकेज 494 कोटी रुपयांचं आहे. तर सलून चालक, टेलर, घरकाम करणारे, मॅकेनिक अशा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येणार आहेत. तर फिल्मलाईन वर्कर्सला 3 हजार देण्यात येणार आहेत. गरीब कल्याण योजने अंतर्गत गरजूंना 5 किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. कर्नाटकमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
CoronaVirus Live Updates : लॉकडाऊनमध्ये असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronaInIndia#lockdown#ReliefPackagehttps://t.co/ZV2zirhaco
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2021