CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू, विरह सहन न झाल्याने पतीची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:35 AM2021-08-30T08:35:19+5:302021-08-30T08:41:08+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पतीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांनी या संकटात आपल्या जवळची माणसं गमावली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पतीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.
कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पतीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या होशंगाबादमध्ये राहणाऱ्या एका वकिलाच्या पत्नीला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा मोठा मानसिक धक्का बसल्याने वकील नैराश्यात गेले होते. त्यानंतर त्याने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आनंद दुबे असं या वकिलाचं नाव असून ते परिसरात अत्यंत लोकप्रिय वकील असल्याचं म्हटलं जातं.
CoronaVirus Live Updates : संकटं संपता संपेना! कोरोनातून ठीक झाल्यावरही रुग्णांमध्ये 'ही' लक्षणं; तज्ज्ञांच्या चिंतेत भर#coronavirus#CoronavirusUpdateshttps://t.co/ntufcag6O0
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2021
आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आनंद खूप दु:खी झाले होते. कामात देखील त्यांचं लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे आनंद यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आई-वडिलांचं छत्र हरपल्याने त्यांचा मुलगा आता अनाथ झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने 6 मुलं अनाथ झाली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यामध्ये अमाहा गावात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कुटुंबाची वाताहत झाली आहे.
CoronaVirus Live Updates : भीषण! कोरोना मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने शवगृहात जागाच शिल्लक नाही....#CoronavirusUpdates#coronavirus#Americahttps://t.co/INgZsiHWt5
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2021
...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 6 मुलं झाली अनाथ
कोरोनामुळे घरातील कर्त्या मंडळींचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आधी वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आईला देखील जीव गमवावा लागला आहे. अवघ्या काही महिन्यांत दोघांचाही मृत्यू झाल्याने सहा मुलं आता पोरकी झाली आहेत. सर्वात मोठी मुलगी ही सात वर्षांची आहे. तर सर्वात लहान चिमुकला अवघा आठ महिन्यांचा आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मुलीवर मदत मागण्याची वेळ आली आहे. भावंडांचं पोट भरण्यासाठी सात वर्षीय मुलगी गावातील घराघरात जाऊन अन्न मागत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मुलांची आई घर चालवत होती. पण कोरोनाने तिचाही मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण आता नातेवाईकांनी देखील मुलांकडे पाठ फिरवली आहे.
परिस्थिती गंभीर! कोरोनानंतर आता रहस्यमयी आजाराचे थैमान; 26 चिमुकल्यांसह 50 जणांनी गमावला जीवhttps://t.co/zjqfSlg32h
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2021