CoronaVirus Live Updates : कोरोनावर मात देण्यासाठी केजरीवाल सरकारचा नवा प्लॅन; प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:42 PM2021-05-15T14:42:15+5:302021-05-15T14:45:52+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : दिल्लीतील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

CoronaVirus Live Updates new plan of kejriwal government to beat corona oxygen bank will start in delhi | CoronaVirus Live Updates : कोरोनावर मात देण्यासाठी केजरीवाल सरकारचा नवा प्लॅन; प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक

CoronaVirus Live Updates : कोरोनावर मात देण्यासाठी केजरीवाल सरकारचा नवा प्लॅन; प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल असून रुग्णांचा आकडा 2,43,72,907 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,26,098 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,890 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,66,207 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे दिल्लीतही परिस्थिती गंभीर आहे. याच दरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा आणि रुग्णालयात जाणवणारी बेडची कमतरता यासाठी दिल्ली सरकारने नवीन प्लॅन तयार केला आहे. दिल्लीतील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेरची बँक उभारण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. या योजनेची अमलबजावणी आजपासून होणार आहे. कोरोनाबाधित अनेक रुग्णांना घरी आयसोलेट करण्यात आलं आहे. त्यांना ऑक्सिजनची गरज भासू शकते. यासाठी केजरीवाल यांनी या रुग्णांना घरपोच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या मागणीनंतर दोन तासाच्या आत त्यांना ही सेवा मिळणार आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांनाही ही सेवा घेता येणार आहे.

"आजपासून आम्ही दिल्लीत ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक सुरू करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात 200 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक असतील. मेडिकल ऑक्सिजन वेळेत उपलब्ध न झाल्यास अनेक रुग्णांना आयसीयूत भरती करावं लागतं. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही होतो. त्यामुळे ही समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे" असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या 24 तासांत दिल्लीत 6500 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर 11 टक्क्यांवर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Black Fungus वर प्रभावी ठरतोय तब्बल 100 वर्षे जुना असलेला 'हा' खास फॉर्म्युला; डॉक्टरचा मोठा दावा

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. "म्युकोरमायकोसिस" असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. 

'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका डॉक्टरने यावर प्रभावी आणि अगदी किफायशीर असा उपचार केल्याचा दावा केला आहे. या डॉक्टरने 100 वर्षांपेक्षा जास्त जुना फॉर्म्युला सांगितला आहे. हा उपाय सर्वात स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे. जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी हा दावा केला आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates new plan of kejriwal government to beat corona oxygen bank will start in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.