CoronaVirus Live Updates : भयावह! मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना; 90 किमी दूर करावे लागताहेत अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:25 PM2021-04-26T12:25:49+5:302021-04-26T12:33:12+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. 

CoronaVirus Live Updates no space in crematorium dead body from agra to aligarh | CoronaVirus Live Updates : भयावह! मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना; 90 किमी दूर करावे लागताहेत अंत्यसंस्कार 

CoronaVirus Live Updates : भयावह! मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना; 90 किमी दूर करावे लागताहेत अंत्यसंस्कार 

Next

नवी दिल्ली - जगातील सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. 

कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती भयंकर होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही. मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले आहेत. आग्रा शहरातील लोकांवर आपल्या नातेवाईकांचे मृतदेह तब्बल 90 किलोमीटर दूर अलीगडमध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

आग्रा शहरातील स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठीही तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. याच दरम्यान लोको पायलट प्रेमपाल सिंह यांचे निधन झाले. त्यानंतर मुलाने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र स्मशानभूमीत जागाच नसल्याने त्याने अलीगढमध्ये जाऊन वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी 90 किलोमीटरचा प्रवास केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीत हे धक्कादायक चित्र पाहायला मिळालं आहे. पार्किंगमध्येच आतापर्यंत पंधरा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून सतत मृतदेह जळत असल्यानं स्मशानभूमीमधील फरशी आणि प्लेटदेखील खराब झाल्या आहेत. पूर्व दिल्लीतील पाच स्मशानभूमीपैकी सीमापुरी स्मशानात परिस्थिती सर्वात वाईट आहे. कोविडसाठीचे 12 प्लॅटफॉर्मही कमी पडत असल्याचं चित्र आहे. याच कारणामुळे स्मशानभूमीजवळ असणाऱ्या दिल्ली महानगरपालिकेच्या पार्किंगच्या जागेवर लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ज्योत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या आधी याठिकाणी लहान मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र पाच वर्षांपूर्वी येथे मुलांवर अंत्यसंस्कार करणं बंद करण्यात आलं होता. 


 

Web Title: CoronaVirus Live Updates no space in crematorium dead body from agra to aligarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.