CoronaVirus Live Updates : कडक सॅल्यूट! ...अन् वृद्ध महिलेने आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणासाठी सोडला बेड, वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:29 AM2021-05-08T11:29:50+5:302021-05-08T11:32:16+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या कठीण काळात माणुसकी जपली आहे. राजस्थानमध्ये एका तरुणाला बेड मिळावा, यासाठी एका वृद्ध महिलेने त्याच्यासाठी आपला बेड सोडल्याची घटना समोर आली आहे. 

CoronaVirus Live Updates older woman regardless of her life saved young man life in pali | CoronaVirus Live Updates : कडक सॅल्यूट! ...अन् वृद्ध महिलेने आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणासाठी सोडला बेड, वाचवला जीव

CoronaVirus Live Updates : कडक सॅल्यूट! ...अन् वृद्ध महिलेने आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणासाठी सोडला बेड, वाचवला जीव

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय महिलेने आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाचा जीव वाचवला आहे. 

कोरोनाच्या या कठीण काळात माणुसकी जपली आहे. राजस्थानमध्ये एका तरुणाला बेड मिळावा, यासाठी एका वृद्ध महिलेने त्याच्यासाठी आपला बेड सोडल्याची घटना समोर आली आहे. ही महिला स्वत: ऑक्सिजनद्वारे श्वास घेत आहे. मात्र तो तरुण कोरोनाग्रस्त असून त्याची तब्येत फार गंभीर असल्याने तिने त्याला बेड देण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील पालीमध्ये राणा नावाचे गाव आहे. या गावात 60 वर्षीय लेहर कंवर राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी बेड उपलब्ध नव्हता. 

जवळपास चार तास ओपीडीच्या व्हिलचेअरवर थांबल्यानंतर लेहर यांना बेड मिळाला. मात्र त्याचवेळी एका तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. ऑक्सिजन लेव्हल 43 वर आली. पण रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त असल्याने बेड उपलब्ध होत नव्हता. त्याचवेळी लेहर कंवर आणि त्यांच्या पत्नीने आम्ही बेडसाठी आणखी दोन तास वाट पाहू पण आमचा बेड या तरुणाला द्या असं डॉक्टरांना सांगितलं आणि तरुणाचा जीव वाचवला आहे. योग्य वेळी उपचार झाल्याने तरुणाची प्रकृती आता  ठीक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयावह! स्मशानभूमीत सतत जळताहेत चिता; धुरामुळे लोकांनी घेतला धसका; राहतं घरं सोडून स्थलांतर

कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. स्मशानभूमीमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत की आता या स्मशानभूमींच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी याचा धसका घेतला आहे. नागरिकांनी सततच्या धुरामुळे श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचं सांगत स्वत:ची जीव वाचवण्यासाठी आपली घरं सोडली आहेत. अनेकांनी या त्रासामुळे दुसरीकडे राहायला जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. नवी दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीला लागून असलेल्या सनराइज कॉलीनीमधील परिस्थिती इतकी भयंकर आहे की येथील अनेक लोकांनी आपल्या घरांना टाळं लावून दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्मशानभूमीमध्ये सतत जळणाऱ्या चितांमुळे या परिसरामध्ये सतत धूर निर्माण होत असतो. या धुराचा कॉलनीमध्ये राहणाऱ्या वयस्कर व्यक्तींबरोबरच मुलांना आणि सर्वांनाच त्रास होऊ लागला आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates older woman regardless of her life saved young man life in pali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.