CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! मेरठमधील रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू; अनेकांचा जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 05:50 PM2021-04-26T17:50:14+5:302021-04-26T17:54:01+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मेरठमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केएमसी असं या रुग्णालयाचं नाव असून गेल्या 24 तासांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आठ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जे रुग्ण आपल्या सोबत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णालयाने सकाळीच आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची नोटीस लावली होती.
CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! रुग्णालयामध्येही काही वेळ पुरेल इतकाच साठा उपलब्धhttps://t.co/CO2eYYZH5E#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#OxygenShortage#OxygenCylinders
— Lokmat (@MiLOKMAT) April 24, 2021
"ऑक्सिजन उपलब्धतेसाठी रुग्णालय प्रशासन हे पूर्णत: जिल्हा प्रशासना आणि मेरठवर अवलंबून आहे. आम्हला जसा ऑक्सिजन उपलब्ध होत आहे तसा तो आम्ही रुग्णांना देत आहोत. मात्र सध्या परिस्थिती कठीण आहे याची माहिती आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना देत आहोत" असं रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
CoronaVirus Live Updates : भारीच! सर्वत्र रंगलीय 'या' प्रिस्क्रिप्शनची जोरदार चर्चा, ड़ॉक्टरांनी दिला मोलाचा सल्लाhttps://t.co/A0EfdErRIH#coronavirus#CoronavirusIndia#coronainmaharashtra#MaharashtraFightsCorona#OxygenShortage#OxygenCylinders#tree
— Lokmat (@MiLOKMAT) April 24, 2021
दिल्लीच्या जयपूर गोल्ड रुग्णालयामध्ये ऑक्सिजन अभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील बत्रा आणि सर गंगाराम रुग्णालयामध्येही काही वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. जयपूर गोल्डन रुग्णालयाचे एमडी डॉ. डी के बलूजा यांनी दावा केला आहे की, काल रात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर असलेल्या 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये आणखी एक रुग्णालय सरोजमध्येही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळेच नव्या रुग्णांना भरती करत नसल्याचं तसंच आहे. बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनचा एक टँकर पोहचवण्यात आला आहे. डॉक्टर गुप्ता यांनी रुग्णालयाला 500 किलो ऑक्सिजन ट्रकने पोहचवण्यात आला. मात्र तो फक्त एक तासापुरताच उपलब्ध आहे. रुग्णालयात 260 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
CoronaVirus Live Updates : येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होणार; रिपोर्टमधून संशोधकांचा मोठा दावाhttps://t.co/ad1hILsLFU#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 24, 2021
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! प्रेमासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ; असा झाला भयंकर प्रकार उघडhttps://t.co/YwgVhgIGzq#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Remdisivir#RemdesivirBlackMarketing
— Lokmat (@MiLOKMAT) April 24, 2021