CoronaVirus Live Updates : आपलेही झाले परके! कोरोनाने मृत्यू झाल्यावर मुलाने फिरवली पाठ; वडिलांवरील अंत्यसंस्कारास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:20 PM2021-06-21T18:20:58+5:302021-06-21T18:44:48+5:30

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.

CoronaVirus Live Updates panipat son left corona infected father body in hospital not ready for cremation | CoronaVirus Live Updates : आपलेही झाले परके! कोरोनाने मृत्यू झाल्यावर मुलाने फिरवली पाठ; वडिलांवरील अंत्यसंस्कारास दिला नकार

CoronaVirus Live Updates : आपलेही झाले परके! कोरोनाने मृत्यू झाल्यावर मुलाने फिरवली पाठ; वडिलांवरील अंत्यसंस्कारास दिला नकार

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन कोटींवर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर मुलाने देखील अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र नातेवाईकांनी मृतदेहांकडे पाठ फिरवल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. अशा मृतदेहांवर जनसेवा दल अंत्यसंस्कार करत आहेत. जनसेवा दलाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी फोन केला असता त्यांनी नकार दिला आहे. काही लोक तर कोरोना झाल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल करतात पण नंतर पाहत देखील नाहीत. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुलाला फोन करण्यात आला मात्र त्याने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जाते. कोरोनामुळे आपलेही परके झाले आहेत. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने दोन मुलं अनाथ झाली आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्या मंडळींचा मृत्यू झाला आहे. 

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 2 मुलं झाली अनाथ

कोरोनामुळे आधी बाबांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आईला देखील जीव गमवावा लागल्याचं मुलांनी म्हटलं आहे. अवघ्या काही महिन्यांत दोघांचाही मृत्यू झाल्याने दोन मुलं आता पोरकी झाली आहेत. मुकेश जोशी असं या मुलांच्या वडिलांचं नाव आहे. ते फार्मासिस्ट म्हणून नोकरी करत होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आणि 13 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पत्नी देखील कोरोना संक्रमित झाली. गेले कित्येक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 20 जून रोजी त्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने दोन्ही मुलं आता पोरकी झाली आहेत. या मुलांकडे लक्ष देण्यात यावं तसेच त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी विनंती गावकऱ्यांनी पंजाब सरकारकडे केली आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates panipat son left corona infected father body in hospital not ready for cremation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.