CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! सिंहांपाठोपाठ आता हत्तीही कोरोनाच्या विळख्यात?; 28 हत्तींची करण्यात आली चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:12 AM2021-06-09T08:12:57+5:302021-06-09T08:19:47+5:30
Tamilnadu Corona Test Of 28 Elephants In Zoo : सिंहापाठोपाठ आता हत्तींची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - देशातील रुग्णांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली आहे. तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. याच दरम्यान चेन्नईजवळ असलेल्या वंडलूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयात (Arignar Anna Zoological Park ) एका सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सिंहिणीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आहे. तसेच 9 सिंह हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सिंहापाठोपाठ आता हत्तींची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
सिंहानंतर आता 28 हत्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या मदुमलाई टायगर रिझर्व्हमधील (Mudumalai Tiger Reserve) हत्तींना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. येथील तब्बल 28 हत्तींची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या हत्तींचे नमुने हे उत्तर प्रदेशच्या इंडियन वेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहेत. सर्व हत्ती 2 ते 60 वयोगटातील आहेत. त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. हत्तींची चाचणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Tamil Nadu | 28 elephants at Mudumalai Tiger Reserve tested for COVID19
— ANI (@ANI) June 8, 2021
"Samples have been sent to Indian Veterinary Research Institute in Uttar Pradesh. All elephants between 2 and 60 years of age were tested, results awaited," says Forest Ranger, Theppakadu Elephant Camp pic.twitter.com/o11brqS9gO
प्राणिसंग्रहालयातील 9 वर्षांच्या निला नावाच्या सिंहिणीचा 3 जून रोजी मृत्यू झाला. एक दिवसापूर्वीच तिच्या नाकातून स्त्राव येत होता, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. प्राणिसंग्रहालयातील 11 पैकी 9 सिंहांचा कोरोना चाचणी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे पाठवण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंहांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.
26 मे रोजी संसर्गाची लक्षणं ही समोर आली होती. प्राणिसंग्रहालयातील एनिमल हाउस 1 मध्ये ठेवण्यात आलेल्या 5 सिंहांमध्ये भूक न लागणं आणि अधून-मधून खोकला येत असल्याची लक्षणं दिसली. सिंहांच्या रक्ताचे नमुने हे तामिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात पाठण्यात आले, असं प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आलं. प्राणिसंग्रहालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली गेली आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली होती.
आठ सिंहाना कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन सिंहिणी देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये असणाऱ्या लायन सफारी पार्कमधील (Etawah Safari Park) दोन सिंहिणी पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. गौरी आणि जेनिफर असं या सिंहिणींचं नाव असून त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. सफारी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आता दोन सिंहिणींची प्रकृती स्थिर आहे. इटावा सफारी पार्कचे संचालक केके सिंह यांनी याबाबत माहिती दिली होती. इटावा सफारीमध्ये असणाऱ्या या दोघींची तब्येत गेले काही दिवस खराब होती.
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोना घेतोय आता प्राण्यांचाही बळी; सिंहिणीच्या मृत्यूने खळबळ#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Lionshttps://t.co/N8MqWva3By
— Lokmat (@MiLOKMAT) June 5, 2021