CoronaVirus Live Updates : प्राण्यांनाही कोरोनाचा धोका! लायन सफारी पार्कमधील दोन सिंहिणी पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 12:13 PM2021-05-08T12:13:05+5:302021-05-08T12:17:18+5:30
Two Lionesses Have Tested Positive For Covid 19 : प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,18,92,676 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,38,270 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान आता प्राण्यांना देखील कोरोनाचा अधिक धोका असल्याची माहिती समोर येत आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. आठ सिंहाना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता दोन सिंहिणी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये असणाऱ्या लायन सफारी पार्कमधील (Etawah Safari Park) दोन सिंहिणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गौरी आणि जेनिफर असं या सिंहिणींचं नाव असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सफारी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आता दोन सिंहिणींची प्रकृती स्थिर आहे. इटावा सफारी पार्कचे संचालक केके सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. इटावा सफारीमध्ये असणाऱ्या या दोघींची तब्येत गेले काही दिवस खराब होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Two lionesses have tested positive for COVID-19 at Etawah Safari Park. Both of them have been kept in isolation: Director, Etawah Safari Park
— ANI UP (@ANINewsUP) May 8, 2021
काही दिवसांपूर्वी हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB)ने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिलेली नाही. रिपोर्टनुसार, CCMB या सँपलची जीनोम सिक्वेंसिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करतील. त्या माध्यमातून सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याचा तपास केला जाईल. इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर तातडीने कोरोना संसर्गित सिंहांवर उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्राणीसंग्रहलयातील अधिकाऱ्यांकडून सिंहांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन केला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरुन त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे का याची माहिती मिळणार आहे.
बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयातील 8 सिंह पॉझिटिव्ह
एएनआय या वृत्तसंस्थेने नेहरू जूलॉजिकल पार्कच्या पीआरओनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर प्राण्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली. आम्ही अहवाल येण्याची वाट पाहत आहोत. डॉक्टर सिंहांच्या प्रकृतीचं परिक्षण करत आहेत, अशी माहिती दिली आहे. यापूर्वी अन्य देशात प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र आता भारतात पहिल्यांदाच प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
द हिंदूने सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 24 एप्रिलला प्राणीसंग्रहालयातील केअरटेकर्सना सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणं आणि खाणं जात नसल्याची लक्षणं दिसून आली. त्यानंतर तातडीने पशुपालन अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर सिंहांचा स्वॅब घेण्यात आला आणि ते सीसीएमबीला पाठवण्यात आले. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय असलेलं नेहरू जूलॉजिकल पार्क पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. प्राणी संग्रहालयातील 12 पेक्षा अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 8 सिंहांना कोरोनाची लागण, भारतातील हे पहिलंच प्रकरण#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Lions#animalhttps://t.co/72fBUOBD54
— Lokmat (@MiLOKMAT) May 4, 2021