CoronaVirus Live Updates : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'फोन पे चर्चा'; CoWIN अॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:13 PM2021-05-08T13:13:43+5:302021-05-08T13:20:57+5:30
CoronaVirus Live Updates Uddhav Thackeray And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली असून आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसची (CoronaVirus) दुसरी लाट लसीकरण आणि बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन लावूनही थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून सलग नव्या रुग्णांचा आकडा हा चार लाखांच्या पार येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांचा आकडाही कमालीचा वाढू लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,01,078 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,38,270 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली असून आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहिलं आहे. कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) राज्यासाठी वेगळे अॅप तयार करण्याची परवानगी द्या. कोविन अॅपवर सातत्याने समस्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,18,92,676 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
PM Narendra Modi spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the COVID-19 related situation in the state pic.twitter.com/MvcOvUcaq1
— ANI (@ANI) May 8, 2021
लसीकरण का महत्वाचे?
कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्यानं लसींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी लसीकरण किती महत्वाचं आहे हे सांगणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होणारे रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून त्यांना वाचवता येतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. देशातील एकूण 1 लाख कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. यातून समोर आलेली अंतिम माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Maharashtra CM Uddhav Thackeray has written to Central government, seeking permission to develop a separate app for COVID vaccination in the state. He wrote the letter following complaints of frequent glitches in CoWIN platform.
— ANI (@ANI) May 8, 2021
(file photo) pic.twitter.com/MVIxZwFyDh
कोरोना रुग्णांना सेवा देताना डॉक्टर्स सर्वात मोठ्या धोक्याचा सामना करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. कोरोना लसीमुळे डॉक्टरांना एक बुस्टर मिळाला आहे. लस घेऊनही कोरोना होत असला तरी त्याचं इन्फेक्शनचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. अगदी सात दिवसांतही रुग्ण बरा होतो. विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण होत नाही. त्यामुळे लसीबाबतच्या सर्व भ्रामक गोष्टींना बाजूला ठेवून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, अशी माहिती प्राध्यापक आर.के.धिमान यांनी दिली.
"भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून द्या"#Congress#RahulGandhi#CoronavirusIndia#CoronavirusPandemic#NarendraModi#ModiGovernmenthttps://t.co/znKgN7QkyLpic.twitter.com/JjBLeMp1jh
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता 'ब्लॅक फंगस'चा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण#CoronavirusIndia#blackfungus#India#Doctor#Hospitalhttps://t.co/nW0R2soU2U
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021