CoronaVirus Live Updates : "आम्हाला कामचोर, मूर्ख म्हणतात, टोमणे मारतात"; CMO वर गंभीर आरोप करत डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 09:41 AM2021-05-13T09:41:49+5:302021-05-13T09:51:06+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर आतापर्यंत दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींवर गेली असतानाच उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान आता उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये या डॉक्टरांनी अपर मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
डॉक्टरांच्या असोसिएशनचे सचिव डॉ. संजीव कुमार यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. येथील अधिकारी आम्हाला कामचोर आणि मूर्ख म्हणतात असं संजीव कुमार म्हणाले आहेत. तुम्ही लोक काम करत नाही. सतत लखनऊ आणि कानपूरला पळून जाता, असे टोमणेही आम्हाला सरकारी अधिकारी मारत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांकडूनच आम्हाला सहकार्य मिळत नाही. त्यांना ग्रामीण भागांमध्ये लसीकरण करण्यात अजिबात रस नाही. मात्र ते आमच्यावर टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत असतात असं देखील म्हटलं आहे. मोठ्याप्रमाणात डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने कोरोना लसीकरणावर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
"खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय", काँग्रेसचा घणाघात#CoronavirusIndia#coronavirus#Congress#YogiAdityanath#UttarPradesh#BJPhttps://t.co/8jjzV1T4cwpic.twitter.com/XtBMydYFMx
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2021
"गावागावात आमच्या टीम काम करत आहेत. मात्र सरकारी पातळीवर त्याची चाचपणी करताना आम्ही काम करत नाही असं दाखवलं जात आहे. आम्ही कामचोर असल्याचं भासवलं जात आहे. जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून आमच्या कामाची दखल घेतली जात नाही. दिवसभरामध्ये काम केलं आहे हे सिद्ध करावं लागतं. आम्ही काम करत असलो तरी आम्हीच काहीच करत नाही असं अनेकदा बोलून दाखवलं जातं. आमच्या या वागणुकीमुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेल्याचा दावा केला जातो" असंही कुमार यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/7rXq9Vso9b
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2021
काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत" असं म्हणत काँग्रेसने घणाघात केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत. कचऱ्याच्या गाड्यांमधून मृतदेह वाहून नेले जात आहेत. मृतदेह नदीत फेकले जात आहे असं असतानाही योगीजी तुम्ही सर्वकाही ठीक असल्याचं सांगत आहात. संत आणि महंत स्वप्नातही खोटं बोलत नाहीत असं म्हणतात. मात्र तुम्ही सर्वकाही ठीक आहे, असा खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय" असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus Live Updates : जाणून घ्या, तरुणांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे का? #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/r5ddhtyH4g
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2021
CoronaVirus Live Updates : केंद्रीय मंत्र्याला शिवीगाळ; मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोळी मारून ठार मारण्याची धमकी; Video व्हायरल#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/oHULAZLon2
— Lokmat (@MiLOKMAT) May 12, 2021