CoronaVirus Live Updates : कोरोना संकटातील धक्कादायक वास्तव! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला होतोय व्हेंटिलेटरचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:17 AM2021-04-06T10:17:40+5:302021-04-06T10:26:23+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच गुजरातमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे.

CoronaVirus Live Updates Ventilators transported in garbage truck in Gujarat's Surat amid Covid spike | CoronaVirus Live Updates : कोरोना संकटातील धक्कादायक वास्तव! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला होतोय व्हेंटिलेटरचा पुरवठा

CoronaVirus Live Updates : कोरोना संकटातील धक्कादायक वास्तव! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला होतोय व्हेंटिलेटरचा पुरवठा

googlenewsNext

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण रुग्णसंख्येने एक कोटीचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे अनेक उपाय केले जात आहेत. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा पुरवठा होत असल्याची माहिती आता मिळत आहे. 

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच गुजरातमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान हा भयंकर प्रकार समोर आला आहे. सूरतमध्ये चक्क कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून रुग्णालयात व्हेंटिलेटर नेण्यात आले आहेत. व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याने 34 व्हेंटिलेटर ट्रकमधून नेण्यात आले. गुजरातमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन सरकारने रुग्णालयांमध्ये तुटवडा भासू लागल्याने गुजरात सरकारने वलसाड येथून सूरतला 34 व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचा आदेश दिला होता. सरकारच्या आदेशानंतर सूरत महापालिकेने व्हेंटिलेटर आणण्यासाठी वलसाडला कचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पाठवला होता. 

वलसाडचे जिल्हाधिकारी आर आर रावल यांनी सूरत महापालिकेने पाठवलेल्या वाहनातून व्हेंटिलेटरची वाहतूक झाल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गुजरातमध्ये साधारण दिवसभरात 3000 च्या आसपास रुग्ण सापडतात. मात्र सोमवारी पहिल्यांदाच यामध्ये मोठी वाढ झाली. 24 तासांत पहिल्यांदाच तीन हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडत 3160 रुग्णांची नोंद झाली. यासोबत गुजरातमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाख 21 हजार 598 झाली आहे. तर आतापर्यंत 4581 जणांचा मृत्यू झाला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाचा हाहाकार! "येत्या दोन आठवड्यात परिस्थिती गंभीर, वेगाने रुग्णसंख्या वाढणार", तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेण्यात येत आहे. मात्र तरी देखील कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग जगभरात थैमान घालणार असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज अमेरिकन साथीचा रोग विशेषज्ञ मायकल ओस्टरहोम यांनी वर्तवला आहे. ओस्टरहोम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महासाथीचा आजार पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे. येत्या काही दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ही संख्या आतापर्यंतच्या रुग्णांपेत्रा अधिक असणार आहे. पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारख्या परिस्थितीचा सामना संपूर्ण जग करत आहे. अमेरिकेबाबत सांगायचं झालं तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली असून ही संख्या आणखी वाढणार असल्याचं देखील ओस्टरहोम यांनी म्हटलं आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates Ventilators transported in garbage truck in Gujarat's Surat amid Covid spike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.