आईला कोरोना झाल्याने 5 दिवसांच्या मुलीला सांभाळतोय 'बाबा'; रुग्णालयाबाहेर लेकीसह पाहतोय वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:24 PM2021-05-14T15:24:48+5:302021-05-14T15:47:13+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या बाळाची जबाबदारी वडिलांवर आली आहे.

CoronaVirus Live Updates Wife in Covid ward, man waits outside with 5-day-old baby in Telangana's Secunderabad | आईला कोरोना झाल्याने 5 दिवसांच्या मुलीला सांभाळतोय 'बाबा'; रुग्णालयाबाहेर लेकीसह पाहतोय वाट

आईला कोरोना झाल्याने 5 दिवसांच्या मुलीला सांभाळतोय 'बाबा'; रुग्णालयाबाहेर लेकीसह पाहतोय वाट

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 2,40,46,809 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,43,144 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,000 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,62,317 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांनी कोरोनाच्या संकटात आपल्या जवळची व्यक्ती गमावली आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही ठिकाणी आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याने लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 

आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या बाळाची जबाबदारी वडिलांवर आली आहे. तेलंगणातील सिकंदराबादमध्ये ही घटना घडली आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने पाच दिवसांच्या मुलीला घेऊन पती रुग्णालयाबाहेर पत्नी लवकर बरी व्हावी म्हणून वाट पाहत असल्याची मन सुन्न करणारा प्रकार पाहायला मिळत आहे. कृष्णा असं या 20 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो मजूर आहे. पाच दिवसांपूर्वी त्याला मुलगी झाली आहे. मात्र याच दरम्यान पत्नीला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला उपचारासाठी तेलंगणातील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

 (Photo - India Today)

मुलीला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मुलीला आईपासून लांब ठेवण्यात आलं आहे. मुलीची देखभाल करण्यासाठी कृष्णा यांची आई त्यांना मदत करत आहे. मुलीला दूध पावडर पाण्यात टाकून पाजली जात आहे. कृष्णा हे तेलंगाणातील झहिराबाद येथे राहणारे आहेत. झहिराबाद हैदराबादपासून 115 किमी लांब आहे. त्यामुळे त्यांनी घरी परतण्याऐवजी रुग्णालयाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नीने कोरोनावर मात केल्यानंतर घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपली मुलगी कोणी चोरून नेईल अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यासाठी ते नीट काळजी घेत आहेत. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

लज्जास्पद! कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने केली सेक्सची मागणी 

देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना माणुसकीला काळीमा घटना समोर आली आहे. लोकांच्या हतबलतेचा, परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा भयंकर प्रकार ट्विटरवरून समोर आला आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates Wife in Covid ward, man waits outside with 5-day-old baby in Telangana's Secunderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.