Coronavirus : देशात २१ राज्यांतील ७५ जिल्ह्यांत लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:37 AM2020-03-23T03:37:23+5:302020-03-23T07:03:44+5:30

Coronavirus : १०० दिवसांत २ कोटी लोक विदेशातून आले भारतात

Coronavirus: Lockdown in 75 districts in 21 states in the country | Coronavirus : देशात २१ राज्यांतील ७५ जिल्ह्यांत लॉकडाऊन

Coronavirus : देशात २१ राज्यांतील ७५ जिल्ह्यांत लॉकडाऊन

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या राक्षसाशी संपूर्ण देशात लढण्यासाठी अखेर भारताची तयारी झाली आहे. एक दिवसाची जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) सोमवार सकाळपासूनच लॉक डाऊनमध्ये (राहत असलेला भाग सोडण्यास प्रतिबंध) रूपांतरित झाली. ही लॉक डाऊन उपाययोजना पहिल्या टप्प्यात दिल्लीसह २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ७५ जिल्ह्यांत लागू झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन या उपाययोजनेत आणखी राज्ये समाविष्ट होऊ शकतील.
जागतिक आरोग्य संघटनेने (हू) गेल्या आठवड्यात पाठवलेल्या एका गोपनीय अहवालानंतरनरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. कोरोनाची महामारी रोखण्यासाठी पूर्ण लॉक डाऊनची गरज असल्याचा इशारा अहवालात देण्यात आलेला आहे. याबाबत एक आॅडियो क्लिप शनिवारी समोर आली. तिच्यात या शिफारशी केलेल्या आहेत. परंतु, प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने असा काही आशय नाकारला आहे.
तथापि, रविवारी सायंकाळी दिल्लीत नवे निर्बंध लागू केले गेल्यानंतर अनेक भागांत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शीघ्र कृती दल तैनात केले गेले.
रेल्वेंत कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह अहवाल असलेले १२ प्रवासी आढळल्यानंतर सरकार सावध झाले. आता यातून लोकांकडून लोकांना कोरोनाची बाधा होऊ शकते म्हणून सरकारला काळजी वाटत आहे.
या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत पॅसेंजर रेल्वेची सेवा ताबडतोब थांबवली गेली आहे आणि अनेक राज्यांनी आंतरराज्य बससेवा २४ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद केली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महत्वाच्या २५ ठिकाणांसह ७५ जिल्ह्यांत हे निर्बंध असून ही यादी तीन दिवसांनंतर दुसरा आढावा घेतल्यानंतर वाढेल.

१०० दिवसांत २ कोटी लोक विदेशातून आले भारतात
कोरोना विषाणूवरील मंत्र्यांच्या गटाने नागरी उड्डयन आणि पर्यटन मंत्रालयाला दिलेल्या सविस्तर अहवालात लक्ष वेधले की, गेला डिसेंबर, जानेवारी, फेब्रवारी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या काही दिवसांपर्यंत दररोज दोन लाखांपेक्षा जास्त भारतीय नागरिक आणि विदेशी लोकांसह प्रवासी कोणतीही तपासणी न होता भारतात आले आहेत. या १०० दिवसांत जवळपास दोन कोटी लोक विदेशांतून भारतात आले आहेत.
जवळपास एक लाख चिनी पर्यटक गेल्या चार महिन्यांत चीनमधून भारतात आले तर भारतात आलेल्या इटालियन पर्यटकांची संख्या सुमारे १.५ लाख आहे. एकट्या २०१९ मध्ये भारतात १.१० कोटी विदेशी पर्यटक आले व त्यांनी सध्या लॉक डाऊन असलेल्या जिल्ह्यांना भेट दिली. हे विदेशी पर्यटक पर्यटनस्थळांवर स्थानिक लोकांमध्ये मिसळले आणि ते पर्यटक अतिशय मोकळेपणे रेल्वे आणि बसेसनी फिरले.
वस्तुस्थिती ही आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २४ व २५ फेब्रुवारी या भारत दौऱ्याच्या दिवसांपर्यंत कोरोना व्हायरसबद्दल धोक्याच्या घंटा क्वचितच वाजवल्या गेल्या. अपवाद फक्त खबरदारीचे उपाय योजना करण्याची केलेली आवाहने. परंतु, कोणतेही निर्बंध किंवा क्लॅम्प डाऊन नव्हते.

Web Title: Coronavirus: Lockdown in 75 districts in 21 states in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.