CoronaVirus: देशात लवकरच Lockdown 2; नेमकं काय बंद आणि काय सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 11:21 AM2020-04-13T11:21:10+5:302020-04-13T11:26:07+5:30

coronavirus २१ दिवसांचा लॉकडाऊन संपत आला तरीही कोरोना नियंत्रणात नाही

Coronavirus Lockdown After 14 April Different Exemptions Likely For Agriculture Factories and goods transport kkg | CoronaVirus: देशात लवकरच Lockdown 2; नेमकं काय बंद आणि काय सुरू?

CoronaVirus: देशात लवकरच Lockdown 2; नेमकं काय बंद आणि काय सुरू?

Next

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. हा कालावधी संपत आला असला तरीही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच अर्थव्यवस्थेसमोरील अडचणीही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. 

लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना सरकार शेत मालासह कारखाने आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या भागांमध्ये निर्बंध कायम राहतील. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांनी याबद्दलचे संकेत दिले होते. लॉकडाऊनमुळे महसुलात ५० ते ७५ टक्के घट झाल्याचं मोदी म्हणाले होते.

लॉकडाऊन २ मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या सवलती सुरू राहतील. धान्य उत्पादन आणि शेतमालाची विक्री यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, याची काळजी लॉकडाऊन २ मध्ये सरकार घेईल. रेड (१५ पेक्षा जास्त रुग्ण असलेले जिल्हे) आणि ऑरेंज (१५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे) झोनमध्ये भाज्या थेट घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे रस्ते आणि बाजारांमध्ये होणारी गर्दी टाळता येईल.

अर्थव्यवस्था आणि कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार लहान आणि मध्यम उद्योग सुरू करण्याची परवानगी देऊ शकतं. कारखान्यातल्या मजुरांनी आतच राहून काम करावं, घरी जाऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, अशा सूचना सरकारकडून दिल्या जाण्याची शक्यता आहे. या कारखान्यातील मजुरांची व्यवस्था जवळच कॅम्पमध्ये करण्यात येईल आणि त्यांना विशेष ट्रेन किंवा बसनं कारखान्यापर्यंत आणलं जाईल. 

Web Title: Coronavirus Lockdown After 14 April Different Exemptions Likely For Agriculture Factories and goods transport kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.