coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 08:58 AM2021-04-20T08:58:09+5:302021-04-20T09:00:46+5:30
lockdown in delhi 2021: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे.
मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी दिल्लीमध्ये ६ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. (lockdown in delhi 2021) ही संचारबंदी काल रात्री १० वाजल्यापासून लागू झाली असून, २६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे. ( After the announcement of the lockdown in Delhi, the workers rushed to the village, the crowd at the bus station)
दिल्लीत सहा दिवसांच्या संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर आनंदविहार पोलीस ठाण्यात परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची मोठी गर्दी झाली. भीती आणि शंका लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मजुरांना दिल्लीत राहण्याचे आवाहन केले होते. तरीही त्यांच्या आवाहनाचा परिणाम झालेला दिसला नाही. अनेक मजुरांना लवकरात लवकर गावी जाण्याची घाई दिसून येत होती.
Delhi: Migrant workers continue to leave for their hometown as the 6-day lockdown in the national capital comes into effect. Visuals from Anand Vihar Bus Terminal.
— ANI (@ANI) April 20, 2021
The lockdown, which started at 10 pm last night, will remain imposed till 5 am on April 26th. pic.twitter.com/8mJfiif2ey
हे दृष्य पाहिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थलांतरीत मजुरांना दिल्लीत थांबवण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. सरकार पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. हे केवळ लहान लॉकडाऊन आहे. तसेच त्याचा अवधी वाढणार नाही. तो वाढवावा लागणार नाही. तुम्ही दिल्ली सोडून जाऊ नका. हा निर्णय आम्हाला नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. या काळात आम्ही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेड्सची व्यवस्था करू. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.