Coronavirus Lockdown: लॉकडाऊन वाढला, पण 'ग्रीन झोन'ला दिलासा; 'ऑरेंज झोन'मध्येही काही व्यवहार सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 07:01 PM2020-05-01T19:01:31+5:302020-05-01T19:16:56+5:30

Coronavirus Lockdown देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवला; १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम

Coronavirus Lockdown Extended For Two Weeks In The Country Some Relaxation In Green And Orange Zones kkg | Coronavirus Lockdown: लॉकडाऊन वाढला, पण 'ग्रीन झोन'ला दिलासा; 'ऑरेंज झोन'मध्येही काही व्यवहार सुरू होणार

Coronavirus Lockdown: लॉकडाऊन वाढला, पण 'ग्रीन झोन'ला दिलासा; 'ऑरेंज झोन'मध्येही काही व्यवहार सुरू होणार

Next

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेला लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. १७ मेपर्यंत देशातील लॉकडाऊन कायम राहील. या काळात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या रेड झोनमध्ये लागू असलेले निर्बंध तसेच राहतील. मात्र ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ऑरेंज झोनमध्ये काही सवलती दिल्या जाणार असून ग्रीन झोनमधील आर्थिक व्यवहार आणि उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होतील. 

गृह मंत्रालयानं दिलेल्या आदेशांनुसार, ग्रीन झोनमध्ये बससेवा सुरू करण्यात येईल. मात्र या बसेस ५० टक्के क्षमतेनंच चालवल्या जातील. बस आगारांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी नसतील. ऑरेंज झोनमधल्या बससेवा सुरू केल्या जाणार नाहीत. मात्र या भागांमध्ये कॅब सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कॅबमध्ये चालकासोबत केवळ एकच प्रवासी असेल. ऑरेंज झोनमधल्या औद्योगिक सेवा सुरू होतील. औद्योगिक संकुलंदेखील सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र रेड झोनमधील निर्बंध कायम राहतील. या ठिकाणी असलेली दुकानं सुरू होणार नाहीत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं खुली राहतील.



देशात एकूण ७३९ जिल्हे आहेत. यातील जवळपास ४० टक्के म्हणजेच ३०७ जिल्ह्यांचा समावेश केंद्र सरकारनं ग्रीन झोनमध्ये केला आहे. ३ मेनंतर या जिल्ह्यांमधले कारखाने, दुकानं, लहान-मोठे उद्योग, वाहतूक आणि अन्य सेवा काही अटी-शर्तींसह सुरू होतील. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर रेड झोनमध्ये लागू असलेले कठोर निर्बंध कायम राहणार आहेत.

देशातील लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांनी वाढवला, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा

आता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणी

मोठी बातमी; लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी धावणार विशेष ट्रेन

Web Title: Coronavirus Lockdown Extended For Two Weeks In The Country Some Relaxation In Green And Orange Zones kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.