LockdownNews: लॉकडाउन 4.0नंतर किती सूट किती सक्ती; 'असा' आहे मोदी सरकारचा मूड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 21:17 IST2020-05-29T21:10:55+5:302020-05-29T21:17:18+5:30
अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकार कोरोना व्हायरसने सर्वाधिक प्रभावित 30 नगर पालिकांमधील कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध लागू ठेवण्याची सूचना नक्की देईल. येथून आतापर्यंत देशातील 80% कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

LockdownNews: लॉकडाउन 4.0नंतर किती सूट किती सक्ती; 'असा' आहे मोदी सरकारचा मूड?
नवी दिल्ली : देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेला संपत आहे. यानंतर केंद्र संरकार नियम निर्धारित करण्यासाठी आपली भूमिका मर्यादित करून राज्यांना अधिक सूट देण्याचा विचार करत आहे. कारोना प्रभावित भागांचे वर्गिकरण करण्यासंदर्भात आणि लॉकडाउनचे नियम निश्चित करण्यासंदर्भात राज्यांकडून सातत्याने व्यक्त केल्या जात असलेल्या भावनांचा केंद्र सरकारही सन्मान करत आहे. यामुळे, मोदी सरकार भविष्यातील मोठ्या भूमिका राज्यांवरच सोपविन्यासंदर्भात विचार करत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आता 1 जूननंतर लॉकडाउनचे नियम किती कठोर करायचे अथवा किती सूट द्यायची, यासंदर्भात राज्यांनाच अधिकार देण्यात येणार आहेत.
कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक
आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मॉल्स आणि सिनेमा गृहांचे काय -
केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय विमानसेवा, राजकीय कार्यक्रम, मॉल्स, सिनेमा गृहांवरील निर्बंध कायम ठेऊ शकते. एवढेच नाही, तर लेकांनी फेस मास्क वापरावे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, यासंदर्भातही नियम बनवण्यास अधिराऱ्यांना सांगितले जाऊ शकते.
शाळा आणि मेट्रो सर्व्हिसवर राज्य निर्णय घेतील?
शाळा आणि मेट्रो सुरू करण्यासंदर्भातील निर्णयाचा चेंडूही केंद्र राज्य सरकारांच्या कोर्टात टाकू शकते. एवढेच नाही, तर धार्मिक स्थळे खुली करण्यासंदर्भातील निर्णयही राज्यांवरच सोडले जाऊ शकतात.
"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'
30 नगर पालिकांवर केंद्रची नजर :
अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकार कोरोना व्हायरसने सर्वाधिक प्रभावित 30 नगर पालिकांमधील कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध लागू ठेवण्याची सूचना नक्की देईल. येथून आतापर्यंत देशातील 80% कोरोना रुग्ण समोर आले आहेत. या 30 नगर पालिका महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, प. बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि ओडिशामध्ये आहेत.
कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक
13 शहरांची समीक्षा -
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आतापासून दर 15 दिवसांनी लॉकडाउनची समीक्षा होईल. यात राज्यांवर अधिक लक्ष दिले जाईल.' केंद्र सरकार मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महनगरांसह 30 शहरांमुळे अधिक चिंतीत आहे
VIDEO : खासदार नवनीत राणांनी घरच्या घरी पतीरायांचे केस कापले; नेटकरी पाहातच बसले!