LockdownNews : 12 मेपासून पुन्हा धावणार रेल्वे गाड्या, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:50 PM2020-05-10T21:50:09+5:302020-05-11T00:55:42+5:30

यापार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने एक सविस्तर योजना तयार केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्रालयाने म्हटले आहे, की या सर्व रेल्वे गाड्या विशेष रेल्वे गाड्या म्हणून चालवल्या जातील.

CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates Indian Railways to restart passenger train operations from May 12 sna | LockdownNews : 12 मेपासून पुन्हा धावणार रेल्वे गाड्या, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन

LockdownNews : 12 मेपासून पुन्हा धावणार रेल्वे गाड्या, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन

Next
ठळक मुद्देभारतीय रेल्वेने 12 मेपासून पुन्हा प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यापार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने एक सविस्तर योजना तयार केली आहेया रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाउदरम्यान भारतीय रेल्वेने 12 मेपासून पुन्हा प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सुरुवातीला 15 रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या केवळ 15 जोड्याच (30फेऱ्या) धावणार आहेत. अशी माहिती रेल्वे विभागाने रविवारी एका निवेदनाद्वारे दिली. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू असून, ते 17 मेपर्यंत असेल.

रेल्वे गाड्या रेल्वे मंत्रालयाने एक सविस्तर योजना तयार केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्रालयाने म्हटले आहे, की या सर्व रेल्वे गाड्या विशेष रेल्वे गाड्या म्हणून, नवी दिल्ली येथून दिब्रूगड, अगरतळ, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावीदरम्यान धावतील. 

आणखी वाचा - LockdownNews : एक आई अशी ही : रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म, नंतर त्याला कडेवर घेऊन चालली 160KM अंतर

या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल. 

रेल्वे स्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांसाठी स्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर्सवरून तिकीट मिळणार नाही. तसेच, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट आहेत, त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. 

आणखी वाचा - LockdownNews : आता लॉकडाउन वाढला तर...?; 'असा' असेल केंद्र सरकारचा प्लॅन

या शिवाय रेल्वे आणखी काही मार्गांवरही विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मात्र, हे उपलब्ध कोचेसवर अवलंबून आहे. कारण 20,000 कोचेस, कोरोना केअर सेंटर म्हणून रिझर्व आहेत. तर 'श्रमिक स्पेशल'च्या रुपात रोज 300 रेल्वे गाड्या चालवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर कोचेस रिझर्व आहेत, असेही रेल्वे विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : धक्कादायक आरोप!; "उशिराने जाहीर करा कोरोनाची महिती, जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना केला होता फोन" 

Web Title: CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates Indian Railways to restart passenger train operations from May 12 sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.