Lockdown 4 : 17 मेनंतर पुन्हा वाढणार लॉकडाउन!; 'या' क्षेत्रांमध्ये सूट देण्याची तयारी, काय आहे महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या मनात?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 11:29 PM2020-05-15T23:29:00+5:302020-05-16T00:13:37+5:30
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार अर्थात, 18 मेपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ग्रीन झोन पूर्ण पणे उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या टप्प्यात हॉटस्पॉट निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्यासारखे नियम सर्वांसाठी बंधनकारक असतील.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा 17 मेरोजी संपत आहे. मात्र, यानंतरही लॉकडाउन सुरूच राहणार, असे स्पष्ट संकेत सरकारने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना लॉकडाउन अद्याप पूर्णपणे हटणार नाही, असे म्हटले होते. याच वेळी, त्यांनी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात अधिक प्रमाणात सूट देण्याचे संकेतही दिले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार अर्थात, 18 मेपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ग्रीन झोन पूर्ण पणे उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या टप्प्यात हॉटस्पॉट निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्यासारखे नियम सर्वांसाठी बंधनकारक असतील.
आणखी वाचा - CoronaVirus News : वैज्ञानिक तयार करतायेत असा मास्क, जो कोरोना व्हायरसच्या संपर्कात येताच बदलेल रंग
ऑरेंज झोनमध्येही बऱ्यापैकी सूट देण्यात येण्याची शक्यता आहे. तर रेड झोनमधील कंटेनमेंट एरियांमध्येच कठोरपणे लॉकडाउन पाळला जाईल, असे समजते. महत्वाचे म्हणजे, रेड झोनमध्ये सलून, चश्म्याची दुकानं खुली करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यासंदर्भात, सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य सरकारांच्या प्रस्तावानंतर, गृह मंत्रालय जारी करेल. राज्य सरकारांना शुक्रवारपर्यंत त्यांचे प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, पंजाब, बंगाल, असाम आणि तेलंगाणा यांची लॉकडाउन सुरूच ठेवण्याची इच्छा आहे. यांपैकी, झोन निश्चित करण्याचा अधिकार, आमच्याकडे असावा, अशी काही राज्यांची इच्छा आहे. सध्या लॉकडाउन पूर्णपणे हटवण्याची कोणत्याही राज्याची इच्छा नाही. मात्र, हळू-हळू आर्थिक व्यवहार सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे.
आणखी वाचा - कुणी 6 Pack, कुणी 8 Pack; संसदेत काम करणाऱ्या तरुणांची बॉडी पाहून व्हाल अवाक
काही प्रमाणावर वाहतुकीची परवानगी -
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कंटेनमेंट एरिया शिवाय, सर्वच ठिकाणी लोकल ट्रेन, बस आणि मेट्रो सेवादेखील काही अंशी सुरू केली जाऊ शकते. तसेच ऑटो आणि टॅक्सींनाही परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, यासंदर्भात अंतिम निर्णय राज्यांचा असेल. ऑरेंज आणि रेड झोनमध्ये बाजार खुले करण्याचा निर्णयही राज्यांनाच घ्यायचा आहे. कंटेनमेंट भाग वगळता रेड झोनमध्येही ई-कॉमर्स कंपन्यांना सर्व वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्याची तयारी सुरू आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये तर त्यांना आधीपासूनच ही परवानगी देण्यात आलेली आहे.
राज्य सरकारांची इच्छा -
देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. यामुळे मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे येथे कोठोरपणे लॉकडाउन सुरू ठेवण्याची महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. तसेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि दुसऱ्या राज्यांत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीची परवानगी देण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. तसेच गुजरात, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळची आर्थिक व्यवहार सुरू करण्याची इच्छा आहे. तर बिहार, झारखंड, ओडिशा सारख्या राज्यांची राज्यात लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदीसह लॉकडाउन सुरू ठेवण्याची इच्छा आहे.