Lockdown : प्रेमीयुगुल मालगाडीत लपून निघाले नाशिकला, गाडी गेली राजस्थानला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 11:26 PM2020-05-06T23:26:44+5:302020-05-07T00:52:49+5:30
जीआरपीने संबंधित युगुलाची चौकशी केली असता, ते यूपीतील बरनाल प्रहलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनपुरी येथील असल्याचे समजले. जीआरपीने संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार त्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले.
आग्रा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच एक प्रेमीयुगुल उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एका मालगाडीत लपून नाशिककडे निघाले. विशेष म्हणजे ही मालगाडी उत्तर प्रदेशातून निघून राजस्थानात पोहोचली. तरीही या युगुलाचा कुणालाही थांगपत्ता लागला नाही.
अशी झाली पोलखोल
दिल्ली-मुंबई रेल्वे लाईनवर असलेल्या हिंडौनसिटी रेल्वे स्थानकाजवळ एका क्रॉसिंगवर गेटमॅनची नजर मालगाडीच्या डब्ब्यात लपलेल्या प्रेमीयुगुलावर पडली. त्याने क्षणाचाही विलंब न करता, रेल्वे स्थानकाच्या मास्तरला या युगुलाची माहिती दिली. यानंतर स्टेशन मास्तरने ही मालगाडी हिंडौनसिटी रेल्वेस्थानकावर थांबवली आणि जीआरपीच्या मदतीने मालगाडीत लपलेल्या प्रेमीयुगुलाला खाली उतरवले. यानंतर गंगापूरसिटी जीआरपीला याची माहिती दिली. यानंतर गंगापूरसिटी जीआरपीने या प्रेमी युगुलाला ताब्यात घेऊन गंगापूरसिटीत नेले.
आणखी वाचा - Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा
चौकशीत समोर आली अशी माहिती
जीआरपीने संबंधित युगुलाची चौकशी केली असता, ते यूपीतील बरनाल प्रहलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनपुरी येथील असल्याचे समजले. जीआरपीने संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार त्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले. जीआरपीने संबंधित प्रेमीयुगुलाच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली आहे. यानंतर दोघांचेही कुटुंबीय यूपी पोलिसांसह गंगापूर सिटीसाठी रवाना झाले आहेत.
आणखी वाचा - 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर
यासंदर्भात जीआरपी ठाण्याचे प्रमुख लक्ष्मण सिंह म्हणाले, संबंधित ठाण्याचे पोलीस आणि कुटुंबीय आल्यानंतर या प्रेमीयुगुलाला त्यांच्या स्वाधीन केले जाईल. प्रहलादपूर येथील आरती कटारिया आणि बरनाल प्रहलादपूर येथील सहदेव, अशी या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.
आणखी वाचा - Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू