CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 10:41 PM2020-04-30T22:41:31+5:302020-04-30T22:52:16+5:30

गृहमंत्रालयाने बुधवारी गाइडलाइन्स जारी करून, सर्व राज्यांना कळवले होते, की लॉकडाउनमुळे अडकलेल्या लोकांना येण्या-जाण्याची सशर्त परवानगी दिली जात आहे.

CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates no trains running only buses will run to send back peoples from states says MHA sna | CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक'

CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक'

Next
ठळक मुद्देदेशात विविध राज्यांत अडकलेल्या नागरिकांना सध्या केवळ बसनेच त्यांच्या गावी पाठविले जाणार आहेकाही राज्यांनी या लोकांसाठी केंद्राकडे रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणीही केली होतीयासंदर्भात गृहमंत्रालयाने बुधवारीच गाइडलाइन्स जारी केली आहे


नवी दिल्‍ली : लॉकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गृहमंत्रालयाने काही गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. यानंतर काही राज्यांनी केंद्राकडे यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणीही केली होती. मात्र, गृहमंत्रालयाने गुरुवारी कोरोनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, या नागरिकांना सध्या केवळ बसनेच त्यांच्या गावी पाठविले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

यासंदर्भात राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून यासाठी रेल्वे चालविण्यात यावी, अशी मागणी केली होती. याशिवाय तेलंगाणाचे मंत्री तालासानी श्रीनिवास यादव यांनीही देशात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे चालविण्याची मागणी केली होती. ते गुरुवारी म्हणाले होते, 'लॉकडाउनमुळे विविध राज्यांत जवळपास 2 कोटी लोक अडकलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स अयोग्य आहेत. लोक एवढ्या गरमीमध्ये 3 ते 4 दिवस एका बसमध्ये कसे प्रवास करू शकतील. बसपेक्षा रेल्वे हा अधिक चांगला पर्याय आहे.'

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात; राज्यपालांनी पाठवलं पत्र

गृहमंत्रालयाने बुधवारी गाइडलाइन्स जारी करून, सर्व राज्यांना कळवले होते, की लॉकडाउनमुळे अडकलेल्या लोकांना येण्या-जाण्याची सशर्त परवानगी दिली जात आहे. यासाठी राज्यांनी बसेसची व्यवस्था करावी. या बसेसना पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात यावे आणि सोशल डिस्‍टंसिंगचेही पालन करण्यात यावे.

Web Title: CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates no trains running only buses will run to send back peoples from states says MHA sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.