CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:02 AM2020-04-28T06:02:20+5:302020-04-28T06:03:04+5:30
मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान किती काळ सहन करावे, कोरोनाचा मुकाबला करताना नव्या ठिकाणी संसर्ग पसरू नये यासाठी काय करावे, असा असंख्य मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना रुग्णांची वाढ होण्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यामुळे इथे ३ मेनंतरही लॉकडाउन कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात फिजिकल डिस्टसिंगचा नियम करून जनजीवन सुरळीत करण्यावर भर दिला. तोच कित्ता ३ मे नंतरही गिरवला जाण्याची दाट शक्यता आहे.
व्हिडीओ कॅन्फरसिंगद्वारे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी सोमवारी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
>सहकार्यामुळे प्रसार रोखू शकलो
इतर देशांमध्ये ७-८ आठवड्यात भारतापेक्षा १०० पट रूग्ण वाढले. वेळेत लॉकडाऊन केले व राज्यांनी सहकार्य केल्याने आपण कोरोनाला रोखू शकलो. पण संकट अद्याप टळलेले नाही. पहिल्या व दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनचा अनुभव गाठीशी घेवूनच आपण पुढचे धोरण ठरवू. मात्र केंद्राने व्यवहार सुरू करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी राज्यांनी करावी. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून जनजीवन पूर्ववत करण्याचे आव्हान आहे. कोरोनाचा मुकाबला व आर्थिक आव्हान दोन्हीचा सामना एकाच वेळी करावा लागेल. नव्या भागांमध्ये कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.
>‘रेड’ व ‘आॅरेंज’वर विशेष लक्ष द्या
गेल्या २८ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांत नवा रुग्ण आढळला नाही. पण ३ मे नंतरही सूट द्यावी अशी स्थिती नाही. राज्यात रेड, ग्रीन व आॅरेंज झोनवर विशेष लक्ष केंद्रीत करा. संसर्ग रोखणे व ग्रीन झोन सुरक्षित राखण्याचे मोठे आव्हान असेल. ग्रीन झोनमध्ये दैनंदिन व्यवहारांना सूट मिळू शकते पण फिजिकल डिस्टन्सिंगला पर्याय नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
>राज्यांनी धोरण ठरवावे
रेड, आॅरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे. कोरोनामुळे इतर आजारांमुळे दूर्लक्ष नको.
तंत्रज्ञान वापरून आपण जीवन सुरळीत व सोपे करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. काही मुख्यमंत्र्यांनी आपले मत यावेळी नोंदवले.
>पंजाब सरकारने नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहिब येथे अडकलेल्या जवळपास साडेतीन हजार भाविकांना स्वगृही आणण्यासाठी ८० बसेस पाठवल्या होत्या़ सोमवारी या गाड्यांमधून भाविक पंजाबला रवाना झाले़ गेल्या दीड महिन्यापासून हे भाविक नांदेडातच अडकले होते़