Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 03:21 PM2020-04-09T15:21:55+5:302020-04-09T15:29:32+5:30

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये पत्नीला भेटता येत नसल्यामुळे एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Coronavirus lockdown man commit suicide as he missing her wife in gonda sss | Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या 

Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या 

Next

गोंडा - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5000 वर पोहचली आहे. तर 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान फक्त जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. याच दरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.

लॉकडाऊनमध्ये पत्नीला भेटता येत नसल्यामुळे एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या विरहामुळे पतीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राकेश सोनी असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. राकेशची पत्नी काही दिवसांसाठी आपल्या माहेरी गेली होती. मात्र लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडामधील राधा कुंड भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. राकेशची पत्नी ही लॉकडाऊनमुळे माहेरी राहिली होती. तिला सासरी येणे शक्य नव्हते. राकेशला पत्नीची खूप आठवण येत होती. पत्नीपासून असलेला हा दुरावा त्याला सहन झाला नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तळीरामांची अडचण झाली आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे काही दिवसांपूर्वी पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार

Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर

CoronaVirus: चिंतेत भर! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ वर; एकट्या मुंबईत ८५७ रुग्ण

Coronavirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव; पाच दिवसांत कोरोनाने घेतला 8,713 जणांचा बळी, पाहा काय सांगते आकडेवारी

 

Web Title: Coronavirus lockdown man commit suicide as he missing her wife in gonda sss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.