VIDEO: महाराष्ट्रातून जाणाऱ्या मजुरांनी रेल्वेतून अन्न फेकलं?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:43 PM2020-05-07T13:43:50+5:302020-05-07T13:50:06+5:30

coronavirus lockdown marathi news परप्रांतीय मजुरांनी रेल्वेतून अन्न बाहेर फेकलं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

coronavirus lockdown marathi news Migrant Labourers Dump Food at Train Station in Bengal kkg | VIDEO: महाराष्ट्रातून जाणाऱ्या मजुरांनी रेल्वेतून अन्न फेकलं?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

VIDEO: महाराष्ट्रातून जाणाऱ्या मजुरांनी रेल्वेतून अन्न फेकलं?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Next

आसनसोल: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे प्रशासनानं श्रमिक विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी परतू लागले आहेत. अशाच काही परप्रांतीय मजुरांनी त्यांना देण्यात आलेलं अन्न गाडीमधून प्लॅटफॉर्मवर फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'महाराष्ट्रातून घरी परतणारे मजूर मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत. घरी जायची सोय झाली तर महाराष्ट्राला शिव्या घालायला लागले. या परप्रांतीयांचा माज बघा,' असा मेसेजदेखील व्हिडीओसोबत पसरवला जात आहे.

लोकमत डॉट कॉमनं या व्हिडीओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये हा व्हिडीओ परप्रांतीय मजुरांचा असल्याचं समोर आलं. मात्र हा व्हिडीओ महाराष्ट्रातला नाही. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधल्या आसनसोल रेल्वे स्थानकातला आहे. रेल्वे स्टेशनवरून निघत असताना मजूर त्यांना देण्यात आलेलं अन्न प्लॅटफॉर्मवर फेकत असल्याचं, मुर्दाबादच्या घोषणा देत असल्याचं यामध्ये दिसत आहे. 



सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ४ मेचा असल्याची माहिती रेल्वेनं दिली. त्या दिवशी स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी श्रमिक विशेष रेल्वे एर्नाकुलमवरुन बिहारमधल्या दानापूरला जात होती. त्यावेळी पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये गाडीला १५ मिनिटांचा थांबा होता. या गाडीत हजारपेक्षा जास्त मजूर होते. 

आसनसोल स्थानकात ट्रेन थांबल्यावर मजुरांना रेल्वेकडून जेवण आणि पाणी देण्यात आलं. मात्र जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार अनेक मजुरांनी केली. अन्न शिळं असून त्याला वास येत असल्याचं म्हणत मजुरांनी ते खिडकीतून बाहेर फेकण्यास सुरुवात केली. मजुरांना देण्यात आलेल्या अन्नाला वास येत असल्याच्या काही तक्रारी आल्याची माहिती पूर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एकलब्य चक्रबर्ती यांनी दिली. काही डब्यांमधून अशा प्रकारच्या अडचणी आल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: coronavirus lockdown marathi news Migrant Labourers Dump Food at Train Station in Bengal kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.