Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:15 AM2020-03-29T11:15:18+5:302020-03-29T11:24:16+5:30
Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 900 वर पोहोचली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 900 वर पोहोचली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बंद असल्याने अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब समोर असतानाच भारतात लॉकडाऊन दरम्यान 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लॉकडाऊन दरम्यान झालेल्या वेगवेगळ्या अपघात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू जवळपास 200 किलोमीटर अंतर पायी चालल्यानंतर झाल्याची माहिती समोर येत आहे. अशा एकूण 13 जणांचा देशात मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा तेलंगणातील शमशाबादमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. मिनी ट्रकमधून जवळपास 30 मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला.
Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यूhttps://t.co/sg4OwvvJ8i#CoronaLockdown#ACCIDENT
— Lokmat (@MiLOKMAT) March 28, 2020
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व लोक चालत आपल्या घराकडे निघालेले असताना रस्त्यातून जाणाऱ्या एका ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर जवळपास 200 किलोमीटर अंतर पायी चालल्यानंतर अचानक एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीहून मध्य प्रदेशाच्या मुरैनाकडे निघालेल्या एका व्यक्तीने चालता-चालता जीव गमावला आहे. रणवीर असं या व्यक्तीचं नाव असून पायी चालत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज अजून काही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबधितांची संख्या 193 वर पोहोचली आहे. पुणे 5, मुंबई 4 तर जळगाव, नागपूर आणि सांगलीमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक नवे रुग्ण आढळले आहेत.
Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबडhttps://t.co/DhAqZl4Zgz#CoronaInMaharashtra#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) March 29, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या
Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
Coronavirus: चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली
Coronavirus: कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; जगातील पहिलीच ह्दयद्रावक घटना
जगातले सगळ्यात महाभयंकर व्हायरस, कोरोनाच्या आधी यांनी घातलेलं थैमान