Coronavirus: देशभरात गेल्या ८ महिन्यात कोरोना रुग्णांचा नीचांक; ११७ जणांचा मृत्यूू, ९,१०२ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:00 IST2021-01-27T07:00:16+5:302021-01-27T07:00:28+5:30
देशात कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६ लाख ७६ हजार ८३८ एवढी झाली आहे. आजवरची मृत्युसंख्या १ लाख ५३ हजार ५८७ झाली आहे.

Coronavirus: देशभरात गेल्या ८ महिन्यात कोरोना रुग्णांचा नीचांक; ११७ जणांचा मृत्यूू, ९,१०२ नवे रुग्ण
नवी दिल्ली : देशभरात गेल्या आठ महिन्यांच्या तुलनेत सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ९,१०२ नव्या रुग्णांच्या नोंदीसह ११७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६ लाख ७६ हजार ८३८ एवढी झाली आहे. आजवरची मृत्युसंख्या १ लाख ५३ हजार ५८७ झाली आहे. देशात ३ जून रोजी एकाच दिवशी ८,९०९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. १६ मे रोजी १०३ जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ कोटी ०३ लाख ४५ हजार ९८५ झाली आहे. कोरोनामुक्त रुग्णांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ९६.९० एवढे आहे तर मृत्यूदर केवळ १.४४ टक्के आहे. उपचारासाठी दाखल कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखापेक्षा कमी नोंदली जाण्याचा मंगळवार हा लागोपाठ सातवा दिवस होता.
कोरोना बाधितांची वाढती संख्या
७ ऑगस्ट २० लाखांपेक्षा जास्त
२३ ऑगस्ट ३० लाख
५ सप्टेंबर ४० लाख
१६ सप्टेंबर ५० लाखांपेक्षा जास्त
१९ डिसेंबर १ कोटीपेक्षा जास्त