CoronaVirus News: ठाकरे सरकार खोटारडं; 80 ट्रेन्स मागितल्याच नाहीत, पीयूष गोयल यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 09:20 PM2020-05-26T21:20:41+5:302020-05-26T21:26:43+5:30

महाराष्ट्रातून 65 गाड्या रिकामी परत आल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे.

CoronaVirus: maharashtra government false statement 80 odd trains migrants piyush goyal vrd | CoronaVirus News: ठाकरे सरकार खोटारडं; 80 ट्रेन्स मागितल्याच नाहीत, पीयूष गोयल यांचा पलटवार

CoronaVirus News: ठाकरे सरकार खोटारडं; 80 ट्रेन्स मागितल्याच नाहीत, पीयूष गोयल यांचा पलटवार

googlenewsNext

नवी दिल्लीः प्रवासी कामगारांसाठी चालवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या मुद्द्यावरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे संजय राऊत आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनीही आता महाराष्ट्र सरकारवर पलटवार केला आहे. ठाकरे सरकारनं 80 गाड्या मागितल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातून 65 गाड्या रिकामी परत आल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे.

पीयूष गोयल म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रासाठी 145 गाड्यांची व्यवस्था केली आहे आणि स्थानकांची माहितीही त्यांना देण्यात आली होती, परंतु मोठ्या खेदानं सांगावे लागेल की, आज दुपारी 12.30वाजेपर्यंत कामगारांविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आज पाच वाजेपर्यंत 74 गाड्या महाराष्ट्रातून सुटतील, पण राज्य सरकारने 24 गाड्यांसाठीच मजुरांची व्यवस्था केली. रेल्वेमंत्री म्हणाले की, राज्यात सुमारे 50 गाड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे परप्रांतीय मजूर तिथे अडकून पडले आहेत.


खरं तर, रविवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ठाकरे सरकारवर टीका करणारं एक ट्विट केलं होतं. पीयूष गोयल म्हणाले होते की, आम्ही महाराष्ट्रासाठी 125 श्रमिक विशेष ट्रेन देण्यास तयार आहोत. आशा आहे की, पूर्वीप्रमाणे स्टेशनवर आल्यानंतर ट्रेन रिकाम्या परत जाणार नाहीत. जेवढ्या गाड्यांची आवश्यकता असेल, तेवढ्या गाड्यांची संख्या उपलब्ध असेल. तत्पूर्वी, रेल्वेने म्हटले आहे की, महाराष्ट्रातून कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी 125 गाड्यांची ऑफर देण्यात आली होती, परंतु राज्य सरकार 25 मे रोजी सकाळी 2 वाजेपर्यंत 41 गाड्यांना मान्यता दिली. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक प्रशासन प्रवाशांना स्थानकात वेळेवर पोहोचवू शकलेले नसल्यानं दोन गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. या 41 पैकी केवळ 39 गाड्या धावू शकल्या.

हेही वाचा

CoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला विमानात बसलेल्या प्रवाशांचा फोटो; म्हणाले...

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर

CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले

"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"

CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

Web Title: CoronaVirus: maharashtra government false statement 80 odd trains migrants piyush goyal vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.